शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिवाळीत घराला फेस्टिव्ह लूक देण्यासाठी वापरा जुन्या साड्या... बघा एकापेक्षा एक सुंदर आयडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2023 15:28 IST

1 / 9
दिवाळीत आपण जसे नवे, सुंदर कपडे घालून आपला लूक बदलून टाकतो, तसंच घराच्या बाबतीतही करता येतं. घराला फेस्टिव्ह लूक दिला तर दिवाळीत आपलं घरही सुंदर सजल्यासारखं दिसेल.
2 / 9
घराला फेस्टिव्ह लूक देण्यासाठी जुन्या साड्यांचा कसा कल्पकतेने उपयोग करता येतो, ते आता पाहूया.. या साध्या सोप्या आयडिया जर प्रत्यक्ष कृतीत आणल्या तर पाहा तुमचं घर दिवाळीसाठी कसं छान सजून जाईल....
3 / 9
यासाठी तर सगळ्यात आधी तुमच्या सगळ्या अशा साड्या बाहेर काढा ज्या चांगल्या तर आहेत, पण तुम्हाला त्या वापरण्याचा कंटाळा आला आहे आणि कुणाला त्या देऊन टाकाव्या अशी इच्छा अजिबात होत नाहीये..
4 / 9
जुन्या साड्यांचा उपयोग करून असे छान कुशन कव्हर शिवता येतील. दोन कॉन्ट्रास्ट रंगही यात वापरता येतील. सोफ्याचा रंग एक आणि उशांचा दुसरा असं कॉम्बिनेशनही छान दिसतं.
5 / 9
उशा आणि सोफे यांच्या रंगसंगतीनुसार जुन्या साड्यांचे छानसे पडदेही शिवता येतील.
6 / 9
घरालाच नाही तर डायनिंग टेबललाही जुन्या साडीचा उपयोग करून असा मस्त फेस्टिव्ह लूक देता येतो.
7 / 9
साध्या फायबरच्या खुर्च्यांना असे छानसे कव्हर घातले तर बघा त्यांचा लूक कसा बदलून जातो. पाहा दिवाळीसाठी जुन्या साड्यांचं असं काही नक्कीच करता येईल.
8 / 9
बेडरुमलाही असा फेस्टिव्ह लूक नक्कीच देता येईल. यासाठी मात्र कॉटन सिल्क प्रकारातल्या साड्या वापरा आणि त्या बेडशीटचा उपयोग अगदीच ४ ते ५ तासांसाठी करा....
9 / 9
बेडरुमलाही असा फेस्टिव्ह लूक नक्कीच देता येईल. यासाठी मात्र कॉटन सिल्क प्रकारातल्या साड्या वापरा आणि त्या बेडशीटचा उपयोग अगदीच ४ ते ५ तासांसाठी करा....
टॅग्स :Diwaliदिवाळी 2023Social Viralसोशल व्हायरलHomeसुंदर गृहनियोजन