Republic Day 2026 Simple Rangoli: प्रजासत्ताक दिनाला ५ मिनिटांत काढा आकर्षक रांगोळी; तिरंगी रांगोळीच्या १० सुंदर डिजाइन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 15:47 IST2025-01-23T18:05:39+5:302026-01-24T15:47:26+5:30
Republic Day 2026 Attractive Rangoli Designs: तिरंग्याची रांगोळी तुम्ही दारासमोर काढू शकता. अगदी ५ ते १० मिनिटांत पटकन काढून होतील अशा या डिजाईन्स आहेत.

Simple Republic Day Rangoli Designs
यंदा २६ जानेवारी २०२६ (Republic Day 2026) रोजी ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिन संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

घरोघरी तसंच सार्वजनिक स्थळांवर तिरंग्याच्या रांगोळ्या काढल्या जातात. या तीन रंगाच्या रांगोळ्याचे काही सोपे पॅटर्न्स पाहूया.

Easy Republic Day Rangoli Designs
तिरंग्याची रांगोळी तुम्ही दारासमोर काढू शकता. अगदी ५ ते १० मिनिटांत पटकन काढून होतील अशा या डिजाईन्स आहेत.

यात तुम्ही पानं, तांदूळ, झेंडूची फुलं या साहित्याचा वापर करून रांगोळीत रंग भरू शकता.

Easy Republic Day Rangoli Designs
या रांगोळ्या काढण्यासाठी तुम्हाला नारंगी, पांढरा, हिरवा आणि निळा रंग आवश्यक असेल.

जर तुमच्याकडे ठसा असेल तर तुम्ही ठश्याच्या मदतीनं रांगोळीत ३ रंग भरून सुंदर अशी रांगोळी काढू शकता.

Happy Republic Day 2025 Simple Rangoli Design
ठिपके, पट्टी,खडूच्या मदतीनं आकर्षक रांगोळी काढा.

या रांगोळीत जय हिंद, वंदे मातरम, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा असे संदेश लिहू शकता.

डाळी, तांदूळाचा वापर करून तुम्ही सुंदर रांगोळी काढू शकता.

(Photo Credit- You Tube, Social Media)

















