शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

'मुलांवर संस्कार करण्याआधी स्वत:.....,' आर. माधवनचा पालकांसाठी डोळे उघडवणारा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 01:01 IST

1 / 7
आर माधवन हा बॉलिवूडमधील एक अत्यंत सुजाण आणि अभ्यासू अभिनेता म्हणून ओळखला जातो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं मुलांच्या संगोपनाबाबत मांडलेले विचार सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. (R Madhavan Shares A Parenting Advice)
2 / 7
माधवनच्या मते मुलांसोबत फक्त ठराविक वेळ क्लालिटी टाईम म्हणून घालवणं ही एक पाश्चात्य संकल्पना आहे. भारतीय संस्कृतीत आपण मुलांसोबत सहज राहतो. (R Madhavans Different Approach To Quality Time)
3 / 7
दिवसातील काही तास वेगळे काढून मुलांशी बोलण्यापेक्षा त्यांच्यासोबत राहणे आणि दैनंदिन जगण्याचा भाग बनवणं महत्वाचे आहे.
4 / 7
मुलांना सतत उपदेश करण्यापेक्षा पालक स्वत:कसे वागतात याकडे मुलं जास्त लक्ष देतात. त्यामुळे स्वत:चे वागणे आदर्श ठेवण्यावर त्यानं भर दिला आहे.
5 / 7
माधवनचा मुलगा वेदांत हा एक यशस्वी जलतरणपटू आाहे. माधवने त्याला अभिनयात येण्यासाठी कधीच सक्ती केली नाही. तर त्याच्या आवडीच्या क्षेत्रात त्याला पूर्ण पाठिंबा दिला.
6 / 7
मुलांशी संवाद इतका मोकळा असावी की त्यांना कोणतीही गोष्ट सांगताना भिती वाटू नये. पालक असण्यापेक्षा मार्गदर्शक असण्यावर त्याचा विश्वास आहे.
7 / 7
शिस्त महत्वाची आहे. पण ती लादलेली नसावी. मुलाला स्वत:च्या चुकांमधून शिकण्याचे स्वातंत्र्या द्यायला हवे.
टॅग्स :Parenting Tipsपालकत्वkidsलहान मुलं