शाकाहारी आहात, डोण्ट वरी -फक्त ‘हे’ पदार्थ एकत्र करुन खा- प्रोटिन मिळेल भरपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2026 16:08 IST2026-02-28T16:02:53+5:302026-02-28T16:08:53+5:30

बहुतांश शाकाहारी लोकांच्या शरीरात प्रोटीन्सची करतरता असते. खरंतर शाकाहारी पदार्थांमध्येही चांगल्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. पण आपण ते योग्य पद्धतीने खात नाही, म्हणून प्राेटीन्स मिळविण्यासाठी त्यांचा म्हणावा तसा उपयोग होत नाही.

म्हणूनच आहारतज्ज्ञांनी भरपूर प्रोटीन्स देणारे काही फूड कॉम्बिनेशन्स gunjanshouts या इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत. हे पदार्थ जर तुम्ही खाल्ले तर शरीरातली प्रोटीन्सची कमतरता भरून निघण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकते.

यापैकी पहिला पदार्थ आहे बदाम. १० भिजवलेले बदाम आणि अर्धी वाटी दही एकत्र करून खाणं प्रोटीन्स मिळविण्याच्या दृष्टीने जास्त फायदेशीर आाहे, असं आहारतज्ज्ञ सांगतात.

१ टेबलस्पून चिया सीड्स १ कप दह्यामध्ये भिजत घाला. हा पदार्थ तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता. यामुळे शरीरातली प्रोटीन्सची कमतरता तर भरून निघतेच, पण पचनशक्ती सुधारण्यासही मदत होते.

राजगिऱ्याचं थालिपीठही अधूनमधून खायला हवं आणि त्यात सुकामेवा घालावा. राजगिरा आणि सुकामेवा एकत्र करून खाल्ल्यानेही शरीरातली प्रोटीन्सची कमतरता दूर होण्यास मदत होते.

भोपळ्याच्या बिया आणि दही हे दोन पदार्थ एकत्र करून खाणंही प्रोटीन्सच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर ठरतं.

पीनट बटर, भोपळ्याच्या बिया आणि दही हे तीन पदार्थ एकत्र करून खा. यातून भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतात.