शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

पायात शोभून दिसणारी मोत्याची जोडवी पाहिली का? जोडव्यांचा पाहा नवा ट्रेण्ड-मिरवा खास दागिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2024 17:48 IST

1 / 9
सध्या लग्नसराई जोरात सुरू आहे. त्यामुळे नव्या नवरीसाठी आवर्जून जोडव्यांची खरेदी केली जाते. जोडव्याचे पारंपरिक प्रकार आपल्याला माहिती आहेतच.
2 / 9
पण सध्या मोत्याच्या जोडव्यांचा भन्नाट ट्रेण्ड आला आहे. यामध्ये एकाहून एक आकर्षक डिझाईन्स मिळतात. काही तरी वेगळं, हटके, युनिक जोडवे डिझाईन हवं असेल तर मोत्याच्या जोडव्यांचे हे काही सुंदर पॅटर्न एकदा बघाच..
3 / 9
मोती जडवलेले हे सुंदर जोडवे पाहा.. यामुळे तुमची पाऊलं निश्चितच अधिक आकर्षक दिसतील.
4 / 9
अशा पद्धतीचे संपूर्ण मोती असलेले जोडवेही मिळतात. तुमच्या साडीच्या रंगाशी मिळतेजुळते जोडवेही तुम्ही घेऊ शकता.
5 / 9
मोत्यांच्या जोडव्यांचा हा आणखी एक सुंदर प्रकार. अगदी बघताक्षणीच आवडेल असे हे डिझाईन आहे.
6 / 9
अशा पद्धतीच्या मोत्याच्या अंगठ्या आजवर आपण अनेकांच्या हातात पाहात आलो आहोत. आता असे मोत्याचे जोडवे मिळत आहेत.
7 / 9
जर एखाद्या समारंभानिमित्त क्वचितच घालायला मोत्याची जोडवी घ्यायची असतील तर या ठसठशीत डिझाईनचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता.
8 / 9
हे ॲडजेस्टेबल प्रकारातलं जोडवं आहे. हे तुम्ही याच पद्धतीने किंवा मोती एकावर एक ठेवूनही घालू शकता.
9 / 9
फुलाचं डिझाईन आणि त्याच्या आत टपोरा मोती हे डिझाईनही आवडण्यासारखं आहे. फंक्शनल किंवा रोजच्या वापरासाठीही हे डिझाईन छान आहेत.
टॅग्स :fashionफॅशनStyling Tipsस्टायलिंग टिप्सjewelleryदागिनेmarriageलग्न