लग्नाला, सणासुदीला पैठणी ना सही, पैठणी जॅकेटने मिळवा रॉयल लूक; पाहा जॅकेटचे स्टायलिश पॅटर्न्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 10:51 IST2022-01-13T17:17:58+5:302022-01-14T10:51:52+5:30

Paithani Jacket : लग्नाला, सणासुदीला ट्राय करा पैठणी जॅकेटचा रॉयल लूक; पाहा जबरदस्त स्टायलिश पॅटर्न्स

महिलांमधली पैठणीची (Paithani saree fashion) आवड आणि हेवा याबद्दल काही वेगळं सांगायला नको. ‘पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा’ पैठणीची ही ओळख पूर्वापारपासून आहे. पारंपारीक तितकीचं मॉडर्न लूक देणारी पैठणी आजही घराघरातील महिलेला हवीहवीशी वाटते. लग्नकार्य, सण उत्सव जणूकाही पैठणीशिवाय अपूर्णच. (paithani jacket mens and womens)

फक्त महिलांच नाही तर पुरूषांमध्येही पैठणीचा फेटा, कुर्ते, जॅकेट कॅरी करण्याचा क्रेझ वाढताना दिसून येतोय. लग्नकार्यात, सणासुदीला किंवा खास प्रसंगाना पैठणी जॅकेट वेअर करून पुरूषही कमालीचा रॉयल लूक मिळवू शकतात. जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी पैठणीची थीम निवडलीत तर संपूर्ण कुटुंबासह पैठणीपासून तयार केलेल्या ड्रेसिंगचे नवनवीन पर्य़ाय उपलब्ध होतील. (Paithani Jacket Styling Tips)

पती, पत्नी, लहान मुलांसाठीही छान छान जॅकेट्सचे पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. पैठणीचे दागिने, जॅकेट्स ब्लेजर नेमके कुठे मिळतात? याची किंमत काय? असे काही प्रश्न तुम्हालाही पडले असतील. म्हणूनच या लेखात पैठणीपासून तयार केलेल्या नवनवीन कलाकृती आणि स्टायलिंग टिप्सबाबत माहिती देणार आहोत.

पुण्यातील धनाज पैठणी पर्स हाऊसच्या संचालिका धनश्री पाठक यांनी पैठणीच्या मॉर्डन स्टाईलबाबत अधिक माहिती दिली आहे. धनश्री यांच्या म्हणण्यानुसार ''पैठणी जेन्ट्स जॅकेट्स गेल्या दोन वर्षांपासून सेमी सिल्क आणि प्युअर सिल्कमध्ये तयार केलं जात आहे. याशिवाय महिलांच्या ब्लेजर्सना सुद्धा गेल्या ४ वर्षांपासून बरीच मागणी आहे. सध्याची तरूणाई पैठणीकडे आकर्षीत व्हावी यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत. सहसा पैठणीचा जास्त वापर केला जात नाही. पैठणीपासून बनवलेली अशी उत्पादनं तयार केल्यानं तरूणाईचा जास्त प्रतिसाद मिळतोय.''

या जॅकेटसाठी तुम्हाला पैठणी फाडायची गरज नाही. जेथे मेनूफॅक्चरींग चालते तिथे पैठणीचे खास कापड बनवले जाते. साधारणपणे गोल्डन बेसवर हे जॅकेट तयार केलं जातं. याशिवाय ग्राहकांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या रंगांमध्येही उपलब्ध होते. काहीवेळा लेडीज कुर्ती मटेरिअलपासून जेन्ट्स जॅकेट तयार केले जातात.

साधारण ३ ते ४ हजारांच्या रेंजमध्ये तुम्हाला पैठणी जॅकेट, पैठणी ब्लेजर उपलब्ध होतात. लहान मुलांचे पैठणी वेअर २००० ते २५०० च्या रेंजमध्ये मिळतात.

याशिवाय तुम्हाला पैठणी जॅकेट्सच्या दागिन्यांचे वेगवेगळे पर्यायही उपलब्ध होतील. पैठणीपासून बनवलेले नवनवीन जॅकेट्स, ब्लेजर, कुर्ते, दागिने घेण्यासाठी तुम्ही paithanipurse.com या साईटला भेट देऊ शकता.

जर पैठणीचे जॅकेट बनवले असेल तर त्याची काळजी देखील तुम्हाला घेता यायला हवी. हे जॅकेट्स तुम्ही नीट ठेवायला हवे. शक्यतो मशीन वॉश टाळा अन्यथा धागे लूज पडण्याची शक्यता असते. तुम्ही जॅकेट वापल्यानंतर त्याचे ड्राय क्लीन करा म्हणजे ते जास्त दिवस टिकेल आणि लूकही खराब होणार नाही.