लाडक्या मुलीसाठी जुन्या साडीचं परकर पोलकं शिवायचंय? बघा ६ सुंदर डिझाईन, लेक दिसेल देखणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2024 16:20 IST2024-04-21T16:15:35+5:302024-04-21T16:20:38+5:30

लग्नसराईच्या दिवसांत लहान मुलींच्या अंगावर परकर पोलक्यासारखे पारंपरिक कपडे खूप छान शोभून दिसतात.

तुम्हालाही तुमच्या लाडक्या लेकीसाठी परकर पोलकं शिवायचं असेल तर हे काही खास डिझाईन्स पाहा.

दोन वर्षांपर्यंतच्या मुलींना असं खांद्यावर लेस असणारे परकर पोलके छान दिसते. शिवाय ते काढायला- घालायलाही सोपे जाते.

उन्हाळ्यातल्या उकाडाच्या त्रास चिमुकल्या मुलींना होऊ नये म्हणून अशा पद्धतीने गळा घेऊन पोलकं शिवू शकता. ५- ६ वर्षांपर्यंतच्या मुलींनाही ते छान दिसेल.

आता अशा पद्धतीच्या झालर असणाऱ्या परकरची फॅशन आली आहे.

अगदी पारंपरिक जुन्या पद्धतीने परकर पोलकं शिवायचं असेल तर अशा पद्धतीने शिवू शकता. यावर ठुशी, नथ असे पारंपरिक दागिने घातले की मुली खूप सुंदर दिसतात.

अशा पद्धतीने जॅकेटचा ड्रेसही शिवू शकता. साडीच्या पदराचे असे जॅकेट मुलींना खूप छान लूक देते. शिवाय हे जॅकेट त्यांना इतर ड्रेसवरही घालता येते.

जुन्या साडीचे सुंदर परकर पोलके शिवण्यासाठी हे आणखी एक छान डिझाईन पाहा.