आईच्या जुन्या साडीचा सुंदर अनारकली ड्रेस; पाहा १२ अनारकली डिझाइन्स-साध्या साडीचाही शिवता येईल सुंदर ड्रेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 16:14 IST2026-01-14T12:41:27+5:302026-01-14T16:14:19+5:30
Old Saree Dresses Latest Idea : आपल्याकडे अनेकदा आईच्या किंवा आजीच्या भारी सिल्कच्या,पैठणी किंवा काठ पदराच्या साड्या कपाटात पडून असतात.

आपल्याकडे अनेकदा आईच्या किंवा आजीच्या भारी सिल्कच्या,पैठणी किंवा काठ पदराच्या साड्या कपाटात पडून असतात. त्यातून नवीन ड्रेस शिवल्यानं त्या मौल्यवान कापडाचा वापर उत्तम होतो. (Old Saree Dresses Latest Idea)

साडीच्या लांबीमुळे त्यातून अनारकली ड्रेस, लॉग्न गाऊन, कुर्ता किंवा नऊवारी साडीचा ड्रेस सहज शिवता येतो.

साडीच्या सुंदर काठांचा वापर आपण ड्रेसच्या गळ्याला, हाताल किंवा खालच्या घेराला लावण्यासाठी करू शकतो. ज्यामुळे ड्रेसला डिझायनर लूक मिळतो.

साडीपासून इंडो वेस्टर्न कपडे जसं की स्कर्ट-टॉप, श्रग किंवा प्लाझो पँट शिवणं सध्या खूपच लोकप्रिय आहे.

जुन्या साडीशी आपल्या आठवणी जोडलेल्या असतात. त्यामुळे त्या साडीचा ड्रेस परिधान केल्यावर एक वेगळाच आनंद मिळतो.

नवीन भारी ड्रेस विकत घेण्यापेक्षा जुन्या साडीचा वापर केल्यानं कमी खर्चात एक भव्य आणि पारंपारीक ड्रेस तयार होतो.

नसाडीचे कापड आणि नक्षी अद्वितीय असल्यामुळे तुमचा ड्रेस बाजारातील रेडीमेड कपड्यांपेक्षा आणि उठावदार दिसतो.

साडीचे कापड अनेकदा मऊ किंवा झिरझिरीत असते. ड्रेसला चांगला आकार आणि मजबूत मिळण्याासठी दर्जेदार अस्तर वापरणं आवश्यक आहे.

साडीच्या पदराचा वापर करून आपण ड्रेसचा पुढचा भाग किंवा मागील गळा आकर्षक बनवू शकता. उरलेल्या काठांपासून मॅचिंग पोटली बॅग किंवा हेअर बँड देखील बनवता येतात.

जर साडी पूर्णपणे वापरण्यायोग्य नसेल तर त्यातील चांगल्या भागापासून लहान मुलांचे परकर-पोलके, फ्रॉक किंवा मुलांसाठी कुर्ती जॅकेट शिवता येतात.

लग्नसमारंभासाठी तुम्ही असं सुंदर जॅकेट शिवून घेऊ शकता. सध्या पैठणी जॅकेटची बरीच क्रेझ दिसून येते.

या ड्रेसेसमध्ये तुम्हाला सुंदर तितकाच कम्फ्रर्टेबल लूक मिळेल ६०० रूपयांपासून ते २००० रूपयांपर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे साडीचे फ्रॉक्स शिवून मिळतील.

















