पांढऱ्या केसांमुळे ऐन तारुण्यात आण्टी दिसता? रामदेवबाबा सांगतात, केस काळे करण्याचा नैसर्गिक उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2025 14:21 IST2025-07-11T13:54:08+5:302025-07-11T14:21:28+5:30

हल्ली कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या खूपच जास्त वाढली आहे. कॉलेजमध्ये जाणाऱ्या कित्येक मुला-मुलींचे केस पांढरे असून त्यांना केस रंगविण्यासाठी वेगवेगळे उपाय करावे लागत आहेत.

हा त्रास कमी करण्यासाठी रामदेव बाबा काही खास उपाय सांगत आहेत. हे उपाय केल्यामुळे तुमचे केस नैसर्गिकपणे काळे राहण्यास मदत होईल आणि कमी वयातच केस पांढरे होणं बंद होईल.(Ramdev baba suggests 5 tips to get rid of white or gray hair)

त्यासाठी रामदेव बाबांनी सांगितलेला पहिला उपाय म्हणजे दररोज सकाळी नियमितपणे कोरफडीचा किंवा आवळ्याचा रस प्यावा. हे दोन्ही रस एकत्र करून प्यायले तरी चालेल. आवळा आणि कोरफडीमध्ये असणारे काही घटक केस नैसर्गिकपणे काळे ठेवण्यास मदत करतात.

दुसरा उपाय म्हणजे नियमितपणे शिर्षासन किंवा सर्वांगासन करा. ही दोन्ही आसने केल्यामुळे डोक्याच्या भागात चांगला रक्तपुरवठा होतो. यामुळे केसांची मुळं पक्की होऊन त्यांची वाढ होण्यासही मदत होते.

हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात खाणे हा उपायही केसांना नैसर्गिकपणे काळं ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे रोजच्या रोज तुमच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या असू द्या.

नखांवर नख घासण्याचा व्यायाम बसल्या बसल्या जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा. यामुळे नखांमध्ये असणारे काही असे पॉईंट दबले जातात जे केसांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतात.

गुळवेलीचा रस प्यायल्यानेही केस काळे राहण्यास मदत होते, असं रामदेव बाबा सांगतात. केसांविषयीची ही माहिती त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केली आहे.