पौष्टिक, चविष्ट आणि वेटलॉससाठी उत्तम नाश्ता हवा? ओट्सपासून करा ५ पदार्थ- घरातल्या सगळ्यांसाठीच फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2025 09:25 IST2025-09-02T09:20:38+5:302025-09-02T09:25:01+5:30

नाश्ता असा पाहिजे असतो जो पौष्टिक आणि चविष्ट असा दोन्हीही असेल. शिवाय तो पाेटासाठीही दमदार हवा.

असा नाश्ता जर तुम्हाला करायचा असेल तर ओट्स वापरून तुम्ही पुढे सांगितलेले काही पदार्थ नाश्त्यासाठी करू शकता.

पहिला पदार्थ म्हणजे ओट्स इडली. ओट्स इडली आणि खोबऱ्याची चटणी किंवा सांबार हे नाश्त्यासाठी एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे.

सगळ्या भाज्या घालून केलेला ओट्सचा उपमाही चव आणि आरोग्यासाठी बेस्ट आहे...

ओट्स, मुगाची डाळ आणि बऱ्याचशा भाज्या असं सगळं एकत्र करून तुम्ही ओट्सची खिचडीही नाश्त्याला खाऊ शकता.

ओट्समध्ये केळी, सुकामेवा, सफरचंद असे पदार्थ घालून स्मुदीही तुम्ही करू शकता.

ओट्स, थोडं बेसन आणि थोडा रवा हे मिश्रण एकत्र करून ओट्सचे धिरडे किंवा डोसेही करता येतात.