लग्नसोहळ्यात उठून दिसेल खास मुनिया पैठणी; ८ आकर्षक रंगात, साडीत शाही लूक मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 17:11 IST2025-12-30T16:55:57+5:302025-12-30T17:11:13+5:30

Muniya Paithani In 8 Attractive Colors :

मुनिया पैठणी ही महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्र परंपरेतील एक अतिशय देखणा आणि लोकप्रिय प्रकार आहे. साडीच्या काठावर विणलेल्या मुनिया विशिष्ट नक्षीमुळे तिला हे नाव मिळाले. (Muniya Paithani In 8 Attractive Colors)

साडीचे आकर्षक रंग आणि डिझाईन्स ट्रेंडींग यामुळे साडी कायम चर्चेत असते. (Single Muniya Paithani Collection)

या साडीच्या संपूर्ण भागावर सोन्याच्या किंवा चांदीच्या जरीने विणलेले लहान गोल बुट्टे, चांदणी किंवा नाजूक फुलं असतात.

पदरावर मोराची जोडी, कमळाची फुलं किंवा पोपट-मैना यांसारखी पारंपारीक नक्षी विणलेली असते.

या पैठणीत हळदी पिवळा रंग, जांभळा, हिरवा, मोरपिशी, चिक्कू रंग असे रंगांचे पर्याय तुम्हाला मिळतील.

हल्ली पेस्टल कलर्स जसं की बेबी पिंक, पीच, पिस्ता ग्रीनमध्येही मुनिया पैठणी उपलब्ध आहे जी तरूणींमध्ये लोकप्रिय आहे.

या साडीचे काठ सोनेरी जरीचे असल्याने ती नेसल्यावर एक वेगळाच रॉयल लूक मिळतो.

या पैठणीमध्ये 'डबल मुनिया' आणि ट्रिपल मुनिया साडीला सध्या जास्त मागणी आहे. कारण तिचे काठ अधिक रुंद आणि उठावदार दिसतात.