साधी साडी पण लूक रॉयल! मल्टीकलर ब्लाऊज डिझाइन्सचे ५ प्रकार, पाहताच तुम्ही पडाल प्रेमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2026 20:00 IST2026-01-01T20:00:00+5:302026-01-01T20:00:02+5:30
Multicolor blouse designs: Saree blouse ideas: Designer blouse patterns: पाहूयात साध्या कॉटन साडीपासून ते रॉयल सिल्क साडीपर्यंत कोणते मल्टीकलर ब्लाऊज छान दिसतील.

सध्याच्या फॅशन ट्रेंडमध्ये साडीच नाही तर ब्लाऊजच्या डिझाइन्सला देखील तितकेच जास्त महत्त्व आहे. एकाच रंगाची साडी पुन्हा पुन्हा नेसताना आपल्याला कंटाळा येतो. पण त्यावर काही मल्टीकलर रंगाचे ब्लाऊज घातले तर आपला पूर्ण लूक बदलेल. (Multicolor blouse designs)

आजकाल महिलांमध्ये मल्टीकलर ब्लाऊज डिझाइन्सची प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. यामध्ये विविध रंगाचे योग्य कॉम्बिनेशन, डिझाइन आणि कट यांचा सुंदर मेळ असतो. पाहूयात साध्या कॉटन साडीपासून ते रॉयल सिल्क साडीपर्यंत कोणते मल्टीकलर ब्लाऊज छान दिसतील. (Saree blouse ideas)

पॅचवर्क मल्टीकलर ब्लाऊजमध्ये वेगवेगळ्या रंगाचे किंवा प्रिटेंड कापड एकत्र करुन त्यापासून ब्लाऊज शिवले जाते. हे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. हे सॉलिड रंगाच्या साडीवर उठून दिसते.

प्रिंटेड मल्टीकलर ब्लाऊज हे अधिक लोकप्रिय आहे. यात आपल्याला फ्लोरल, जिओमेट्रिक, अज्राख किंवा कलमकारी प्रिंट्स पाहायला मिळतील. हे ब्लाऊज रोजच्या वापरात, ऑफिस किंवा कॅज्युअल फंक्शनसाठी देखील वापरता येईल.

हाफ-अँड-हाफ कलर ब्लाऊजमध्ये एका बाजूला एक रंग आणि दुसऱ्या बाजूला दुसरा रंग असलेले ब्लाऊज मॉर्डन आणि क्लासी दिसतात. बॅक डिझाइनमध्ये वेगळा रंग वापरल्यास ब्लाऊज अजून छान दिसतो.

एम्ब्रॉईडरी असलेले मल्टी कलर ब्लाऊजमध्ये रंगीबेरंगी धाग्यांची भरतकाम, मिरर वर्क किंवा कांचकाम केलेले ब्लाऊज सण-समारंभ आणि लग्नासाठी परफेक्ट असतात.

स्ट्राइप्स किंवा ब्लॉक डिझाइन मल्टी कलर ब्लाऊज. हे सरळ रेषांमध्ये किंवा चौकोनी ब्लॉक्समध्ये रंग असलेले ब्लाऊज स्लिम लूक देतात. जे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे.

















