मार्गशीर्ष महिन्याच्या गुरूवारी दारासमोर काढा सोपी सुबक रांगोळी; १० आकर्षक सोप्या डिजाईन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 20:26 IST2025-11-18T17:26:27+5:302025-11-18T20:26:58+5:30
Margashirsha Guruvar Rangoli Designs : रांगोळी काढण्यापूर्वी ती जागा स्वच्छ करून, पाणी शिंपडून घ्या. ज्यामुळे रांगोळी अधिक आकर्षक दिसेल.

मार्गशीर्ष (Margashirsha) महिना हा हिंदू धर्मात पवित्र आणि शुभ मानला जातो. विशषत:महालक्ष्मी देवीच्या पुजेसाठी. या महिन्याच्या गुरूवारी देवीची पूजा करून महिला उपवासही करतात. (Margashirsha Guruvar Special Rangoli Designs)

या महिन्यात प्रत्येक गुरूवारी महालक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते आणि घरासमोर सुंदर रांगोळ्या काढल्या जातात.

या सुंदर रांगोळ्या लक्ष्मी देवीच्या स्वागतासाठी काढल्या जातात.

या रांगोळ्यांमध्ये प्रामुख्यानं कमळ, कलश, स्वातिस्क, शंख,दिवा यांसारख्या शुभ चिन्हांचा वापर केला जातो.

या रांगोळ्या काढताना लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी अशा तेजस्वी, आकर्षक रंगांचा वापर केला जातो.

रांगोळीत फुलं, दिवे, तुळशीचे पान ठेवून तुम्ही तुम्ही ती अधिक सुशोभित करू शकता.

या विशेष रांगोळ्या घरात सकारात्मकता, समृद्धी आणि आनंदाचे वातावरण निर्माण करतात.

काही लोक बॉर्डर रांगोळी देखील काढतात ती घराच्या प्रवेशद्वाराला आकर्षक रूप देते.

रांगोळी काढण्यापूर्वी ती जागा स्वच्छ करून, पाणी शिंपडून घ्या. ज्यामुळे रांगोळी अधिक आकर्षक दिसेल.

या महिन्यात चार किंवा पाच गुरूवार येतात तुम्ही प्रत्येक गुरूवारी वेगवेगळ्या थीमची रांगोळी काढू शकता. या रांगोळ्या केवळ सजावट नसून त्या घरातील महिलांचे कलाप्रेम आणि श्रद्धा व्यक्त करण्याचे माध्यम आहेत.
















