साखरपुडा स्पेशल : साखरेचा पुडा पॅक करण्यासाठी खास डेकोरेशन आयडिया, साखरपुडा पाहताच नवरी खुश..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2025 12:41 IST2025-11-14T12:34:30+5:302025-11-14T12:41:08+5:30

मराठी लग्नात साखरपुडा हा विधी फक्त एकमेकांना अंगठ्या घालण्याएवढाच मर्यादित नसतो. या विधीमध्ये नवरदेवाकडचे लोक नवरीला साखरेचा पुडा. खरंतर यामुळेच हा विधी साखरपुडा म्हणून ओळखला जातो.

हल्ली खूप वेगवेगळ्या पद्धतींनी साखरपुडा पॅक करण्यात येतो...

तो इतक्या छान पद्धतीने सजवून जर होणाऱ्या नवरीला दिला तर ती तर खुष होईलच, पण तिच्यासोबत मुलीकडची सगळी मंडळीच खुष होतील..

हा साखरपुडा तयार करण्यासाठी खूप काही वेगळं साहित्य लागत नाही. अगदी घरात असणाऱ्या वस्तू वापरूनही तुम्ही तो तयार करू शकता..

मराठी लग्नात असा एखादा खण कापडाचा साखरपुडा दिला तर तो जास्तच आकर्षक दिसेल..

खणाच्या साखरपुड्याचा हा बघा एक आणखी सोपा आणि घरच्याघरी सहज जमू शकणारा प्रकार..

अशा पद्धतीने फेटा, नथ, चंद्रकोर आणि गजरा लावून तुम्ही साखरपुडे तयार करू शकता आणि दोन्ही एकत्र करूनच नववधूला देऊ शकता.

या पद्धतीने साखरपुडा तयार करून त्यावर नवरदेव आणि नवरीचा फोटो लावूनही तुम्ही तो होणाऱ्या नवरीला देऊ शकता.

विकतचे साखरपुडे खूप महाग मिळतात. त्यापेक्षा थोडा वेळ काढून असा साखरपुडा घरीच तयार केला तर त्याचा आनंद निश्चितच जास्त असतो..

















