1 / 6आहारात भात हवाच. दुपारी रात्री दोन्ही वेळच्या जेवणात भाताचा समावेश असतो. मात्र अनेकदा भात उरतो. उरल्यानंतर परत शिळा भात खायची कोणाला इच्छा नसते अशा वेळी तो भात फेकला जातो आणि अन्नाची नासाडी होते. त्याऐवजी उरलेल्या भाताचे ५ पदार्थ करा. 2 / 6फोडणीचा भात हा अगदी साधा आणि लोकप्रिय असा पदार्थ आहे. घरोघरी केला जातो. करायला सोपा तसेच सगळ्यांचा आवडीचा आहे. फक्त फोडणी देऊनही करता येतो किंवा भाज्या, शेंगदाणे, मसाले घालूनही करता येतो. 3 / 6उरलेला भात मिक्सरमधून वाटून घ्यायचा. त्यात थोडे पाणी घालून वाटायचा. नंतर त्यात उकडलेला बटाटा कुस्करुन घालायचा मीठ आणि बटर घालायचे. मस्त मिक्स करायचे आणि त्याचे लहान गोळे तयार करायचे. तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळायचे. 4 / 6भाताचे कटलेट करता येतात. मस्त कुरकरीत होतात. भात हाताने कुस्करायचा. त्यात थोडे बेसन , तांदूळ पीठ आणि रवा घालून मळायचे. मसाले, गरम तेल आणि थोडे पाणी घालायचे. भाज्या घाला आणि एकजीव करुन घ्या. हाताने त्याला चपट गोल आकार द्यायचा आणि तव्याला तेल लावून त्यावर परतून घ्यायचे. 5 / 6उरलेल्या भाताचा चायनिज राईस करता येतो. फोडणीचा भात आणि याची चव पूर्ण वेगळी लागते. कांद्याची पात, चायनिज सॉस, गाजर, कोबी सगळं मस्त परतून घ्यायचं. भरपूर लसूण परतायचे. त्यात उरलेला भात घालायचा आणि परतून घ्यायचा. घरगुती चायनीजही चविष्ट होते. 6 / 6उरलेल्या भाताचा चायनिज राईस करता येतो. फोडणीचा भात आणि याची चव पूर्ण वेगळी लागते. कांद्याची पात, चायनिज सॉस, गाजर, कोबी सगळं मस्त परतून घ्यायचं. भरपूर लसूण परतायचे. त्यात उरलेला भात घालायचा आणि परतून घ्यायचा. घरगुती चायनीजही चविष्ट होते.