Makar Sankranti 2026 : संक्रातीला काळी साडी नेसून सुंदर लूक मिरवायचाय, बॉलिवूड अभिनेत्रींच्या पाहा टिप्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2026 17:35 IST2026-01-10T16:43:30+5:302026-01-10T17:35:53+5:30

संक्रांतीच्या निमित्ताने काळी साडी नेसणार असाल पण कसा लूक करावा हे समजत नसेल तर बॉलीवूड अभिनेत्रींचे काळ्या साडीतले हे काही सुंदर लूक पाहा (Makar Sankranti 2026 special black saree look). अशा पद्धतीने तुम्ही नटलात तर नक्कीच सगळ्यांपेक्षा सुंदर, आकर्षक दिसाल.(Bollywood actresses in black saree)

सध्या थंडीचे दिवस आहेत आणि यंदा तर थंडीचा खूपच कडाका आहे (how to look smart and beautiful in black saree?). त्यामुळे अशावेळी तुम्ही अशा पद्धतीचं लांब बाह्यांचे ब्लाऊज घालू शकता. ऑफिसला जाणार असाल तर असा लूक छान वाटेल.(black saree look of Bollywood actresses)

प्लेन काळ्या साडीवर मोत्याचे दागिने जास्त उठून दिसतात. त्यामुळे असं काही ट्राय करून पाहा..

काळ्या रंगाची अगदी काठपदराची टिपिकल साडी असेल तर अशा पद्धतीने अंबाडा, गजरा, मोठी टिकली असा पारंपरिक लूक छान वाटेल...

काही जणींना काठपदर साडी नेसून पारंपरिक लूक करायचा असतो पण त्यासोबतच आपण थोडं ट्रेण्डी, फॅशनेबल दिसावं असंही वाटत असतं. अशा जणींना प्रिटी झिंटाचा हा लूक नक्कीच आवडू शकतो.

काळी साडी, त्यावर जॅकेट आणि बेल्ट असा एकदम स्टायलिश, स्टनिंग लूकही तुम्ही करू शकता. खूप हटके, सगळ्यांपेक्षा वेगळ्या दिसाल.

काळी साडी आणि सोनेरी ब्लाऊज असं कॉम्बिनेशनही खूप जबरदस्त आहे. नीता अंबानींचा हा एक असाच सुंदर लूक पाहा.

अशा पद्धतीच्या जाॅर्जेटच्या ब्लाऊजचीही खूप फॅशन आहे. शिवाय दागिन्यांची निवड जर योग्य जमून आली तर तुमचा लूक नक्कीच खुलतो. मोठ्या कानातल्यांची आवड असेल तर ते जरुर घाला. पण मग त्यावर पुन्हा मोठं गळ्यातलं नको. गळ्यात अगदी नाजूक चेन घाला किंवा मग जान्हवीसारखं गळ्यात काहीच घालू नका.
















