'ही' गोष्ट करायची टाळाल तर पोट सुटेल आणि वजनही वाढेल! बघा तुम्हीही तिथेच चुकताय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2025 15:33 IST2025-11-20T15:23:35+5:302025-11-20T15:33:06+5:30

वजन कमी करायचा प्रयत्न सध्या कित्येक जण करत आहेत. पण त्यापैकी सगळ्यांंचंच वजन कमी होतं असं नाही. यामागचं कारण एकच की त्यांचे प्रयत्न बऱ्याचदा चुकीच्या दिशेने चालू असतात.

सेलिब्रिटी डाएटीशियन पुजा माखिजा सांगतात की वजन कमी करायचं म्हणून कित्येकजण नाश्ता करणं टाळतात. पण इथेच त्यांची नेमकी चूक होते.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये माहिती देताना त्या सांगतात की नाश्ता करणं टाळल्याने शरीरावर नेमके काय परिणाम होतात याविषयी अनेक अभ्यास करण्यात आले.

त्यातून असं लक्षात येतं की नाश्ता न करणाऱ्या लोकांमध्ये लठ्ठपणा, पोटाचा घेर वाढणे हे त्रास नाश्ता करणाऱ्या लोकांच्या तुलनेत जास्त दिसत आहेत.

याचं कारण म्हणजे रात्रीपासून १० ते १२ तासांचा गॅप झाल्यानंतर शरीराला अन्नाची गरज असते. काही लोक भूक मारतात, पण नंतर मग दुपारी अगदी भरपेट जेवण करतात.

एकदम खूप खाल्ल्याने पचनक्रिया, मेटाबॉलिझम चांगलं होत नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून वजन, पोट वाढत जातं.

शिवाय नाश्ता टाळल्याने कित्येकांना ॲसिडीटी, डोकेदुखी, चिडचिड होणे असेही त्रास होतात. त्यामुळे नाश्ता न टाळलेलाच बरा.

नाश्ता वेळेवर करा, पोटभर करा आणि तो जास्तीतजास्त पौष्टिक असेल असे बघा..