महाशिवरात्र : शंकराला प्रेमानं वाहतो ती ५ फुलं पाहा, अत्यंत औषधी-अनेक दुखणीखुपणी होतील दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2025 16:45 IST2025-02-25T16:41:29+5:302025-02-25T16:45:06+5:30

Mahashivratri special offerings: Flowers to offer Lord Shiva on Mahashivratri: Ayurvedic benefits of flower offerings to Lord Shiva: 5 flowers for Lord Shiva worship: Ayurvedic remedies for body pain: Flower offerings and their medicinal properties: Flowers for Lord Shiva and their healing effects: महाशिवरात्रीच्या दिवशी कोणती ५ फुलं महादेवाला प्रिय आहेत, जी वाहायला हवीत. इतकेच नाही तर ही फुले अनेक दुखण्याखुपण्यावर रामबाण.

महाशिवरात्री हा शिवभक्तांसाठी अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी भगवान शंकरासह देवी पार्वतीची देखील विधीवत पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शंकर आणि पार्वतीचा विवाह संपन्न झाला होता. म्हणून महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. (Ayurvedic benefits of flower offerings to Lord Shiva)

महाशिवरात्रीच्या दिवशी कोणती ५ फुलं महादेवाला प्रिय आहेत, जी वाहायला हवीत. इतकेच नाही तर ही फुले अनेक दुखण्याखुपण्यावर रामबाण उपाय आहेत. (Ayurvedic remedies for body pain)

आयुर्वेदात अशी काही फुले आहे जी धार्मिक कार्यात देखील महत्त्वाची मानली जातात. ज्याचा वापर आपल्या शरीरासाठी बहुगुणी समजला जातो. जाणून घेऊया त्याबद्दल

चमेलीचे फुल महादेवाला अर्पण केल्याने प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. तसेच त्वचेसाठी आणि केसासाठी चमेलीचे फुल फायदेशीर आहे. या फुलाचा सुगंध घेतल्याने स्ट्रेस कमी होतो. याचा चहा प्यायल्याने शरीर स्लिम होते.

निळ्या रंगाचे गोकर्ण फूल भगवान शंकराला प्रिय आहे. असे म्हटले जाते हे फूल शिवपिंडीवर चढवल्याने आर्थिक अडचणी दूर होतात. या फुलामध्ये अँटिऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे त्वचेची जळजळ कमी करण्यास मदत करते. शरीरातील कोलेजन वाढवते.

धतुऱ्याचे फूल महादेवाला अर्पण केल्याने दु:खातून आणि त्रासातून आपल्याला मुक्ती मिळते. तसेच या फुलाचा आर्युर्वेदात वापर केला जातो. याच्या पानांचा धूर दमा कमी करण्यास मदत करतो. याच्या पानांचा अर्क कानात टाकल्याने डोळ्यांच्या समस्या कमी होतात.

बेलाचे पान शंकराला अतिशय प्रिय आहे. यामध्ये त्रैमूर्तिचा वास असतो असे म्हटले जाते. यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत जे हृदयाचे आरोग्य निरोगी राखण्यास मदत करतात. बेलाचे पान चावून खाल्ल्याने हृदय मजबूत होते.

शिवपिंडीवर आक फुले अर्पण केले जाते. याचा वापर केल्याने त्वचेवरील डाग, सुरकुत्या कमी करण्यास मदत होते. तसेच डोकेदुखी, गुडघेदुखी, कान, दात दुखणे यावर रामबाण ठरते. ही एक औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते.