१ ग्रॅम सोन्यामध्ये लेटेस्ट फॅशनचे सुंदर गोठ, लग्नापासून ऑफिसपर्यंत कुठेही शाेभून दिसणारे ८ आकर्षक डिझाईन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2025 14:11 IST2025-12-27T14:05:11+5:302025-12-27T14:11:05+5:30

टिपिकल बांगड्या घालण्यापेक्षा असे नव्या पद्धतीचे गोठ हातात खूप छान दिसतात. (light weight gold goth designs)

त्यामुळे हल्ली नव्या नवरी किंवा तरुण मुली आणि अगदी वयस्कर महिलाही नेहमीच्या पारंपरिक बांगड्यांपेक्षा अशा पद्धतीचे गोठ घडवून घेण्यात जास्त इंटरेस्टेड आहेत.(gold goth bangles latest patterns)

या गोठमध्ये कित्येक वेगवेगळे प्रकारही उपलब्ध आहेत (8 trendy designs of goth bangles). अगदी नाजूक डिझाईन्स पासून ते हेवी वर्क असणारे गोठ मिळू शकतात.(goth bangles design)

तुम्ही १ ग्रॅम सोन्यामध्येही अशा गोठचे बरेच वेगवेगळे डिझाईन्स पाहू शकता. ऑनलाईन शॉपिंग साईटवरही असे गोठ उपलब्ध आहेत.

अस्सल सोन्यामध्ये असे गोठ घडवून घ्यायचे असतील तर आतल्या बाजूला लाख वापरून बाहेरून सोने अशा पद्धतीचे लाईट वेट गोठ कमी सोन्यामध्ये तयार करून मिळू शकतात.

अशा पद्धतीचे गोठ घातले तर ते ऑफिसमध्येही छान दिसतात. म्हणजेच फॉर्मल आणि इन्फॉर्मल अशा दोन्ही लूकवर ते चांगले वाटतात.

मीनाकाम केलेले कलाकुसर असणारे गोठ लग्न समारंभातही घालू शकता. असा एकच ठसठशीत गोठ हातात असेल तर इतर बांगड्यांची गरजही वाटत नाही.