शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

प्रेग्नंसी टेस्ट घरी करताना तुम्हाला काय माहिती हवं? टेस्ट पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, किट अशी वाचा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 14:40 IST

1 / 8
प्रेग्नंसी किट वापरल्यानंतर त्यावरील रिझल्ट विंडोमध्ये उमटणाऱ्या रेषांचा अर्थ समजून घेणं खूप महत्वाचे असते. काही मुद्द्यांच्या आधारे तुम्ही हे रिजल्ट्स वाचू शकता. (How To Read Pregnancy Test Kit At Home)
2 / 8
किटवर साधारणपणे कंट्रोल (Control) आणि टेस्ट (Test)अशा दोन खुणा असतात. (How To Read Pregnancy Test Positive)
3 / 8
सी म्हणजे कंट्रोल लाईन. किट योग्यरित्या काम करत असेल तर ही लाईन नेहमी उमटतेच.
4 / 8
T म्हणजे टेस्ट लाईन. ही लाईन शरीरातील एचसीजी हॉर्मोनची उपस्थिती दर्शवते.
5 / 8
जर सी आणि टी या दोन्ही जागी गुलाबी किंवा लाल रेषा दिसल्या तर याचा अर्थ रिझल्ट पॉझिटिव्ह आहे.
6 / 8
जर फक्त सी च्या जागी रेषा उमटली आणि टी ची जागा रिकामी राहिली तर रिझल्ट निगेटिव्ह आहे.
7 / 8
जर टी च्या जागी खूप फिकट रेषा दिसत असेल तरीही तो पॉझिटिव्ह रिझल्ट मानला जातो अशावेळी २ दिवसांनी पुन्हा टेस्ट करावी.
8 / 8
जर सी वर रेषा न येता फक्त टी वर येत असेल तर ते कीट खराब आहे असं समजा. रिझल्ट पाहण्यासाठी किटवर दिलेल्या सुचनेनुसार ३ ते ५ मिनिटं वाट पाहा.खूप उशिरा १० मिनिटांनंतर पाहिलेला रिझल्ट चुकीचा असू शकतो.
टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसीHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य