केसांसाठी घरीच तयार करा नॅचरल हेअर डाय- एकही पांढरा केस दिसणार नाही, खर्च ना के बराबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2025 19:47 IST2025-09-30T13:58:36+5:302025-09-30T19:47:25+5:30

पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी बाजारात विकत मिळणारे केमिकलयुक्त डाय वापरायला अनेकांना भीती वाटते.(how to make natural hair dye colour at home?)
शिवाय केसांना मेहेंदी लावल्यानंतर त्यांना येणारा लालसर रंगही खूप जणांना आवडत नाही.
म्हणूनच केस काळे करण्यासाठी घरच्या घरी नॅचरल हेअर डाय कसा तयार करायचा ते पाहूया. ही पद्धत selfcarebysuman या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
यासाठी सगळ्यात आधी केसांना मेहेंदी लावायची आहे. त्यासाठी एका लोखंडी कढईमध्ये पाणी घ्या. त्यात चहा पावडर घालून पाणी उकळून घ्या. यानंतर गॅस बंद करा आणि पाणी गाळून घ्या.
गाळून घेतलेल्या पाण्यात कॉफी पावडर घाला. कॉफी पावडर पाण्यात पुर्णपणे मिसळल्यानंतर त्यात मेहेंदी घाला. आता ही मेहेंदी ८ ते १० तास भिजू द्या.
त्यानंतर जेव्हा तुम्ही केसांना मेहेंदी लावणार असाल त्याच्या आधी मेहेंदीमध्ये बीटरुटचा रस घाला आणि त्यानंतर ती मेहेंदी केसांना लावा.
यानंतर २ ते ३ तासांनी नुसत्या पाण्याने केस धुवून टाका. शाम्पू करू नका.
यानंतर आपल्याला आणखी एक गोष्ट करायची आहे. एका वाटीमध्ये इंडिगो पावडर घ्या. त्यात पाणी टाकून ती कालवा आणि मेहेंदीप्रमाणे केसांना लावा.
हा मास्क केसांवर पाऊण ते १ तास ठेवा. त्यानंतर शाम्पू करून केस धुवून टाका. केसांना खूप छान रंग तर आलेला असेलच पण त्यांच्यावर एक वेगळीच चमकही दिसेल. हा उपाय करण्यापुर्वी पॅचटेस्ट जरुर घ्या.