हॉटेलसारखी चमचमीत दालखिचडी घरी करण्यासाठी ७ टिप्स, झटपट करा चविष्ट वन पॉट मिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 18:53 IST2025-11-06T14:41:35+5:302025-11-06T18:53:40+5:30

How To Make Hotel Style Dal Khichdi At Home : खिचडी मऊ होण्यासाठी डाळ-तांदळाच्या एकूण प्रमाणाच्या तिप्पट पाणी वापरा

डाळ खिचडी म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. घरच्याघरी डाळ खिचडी करणं एकदम सोपं आहे. घरी केलेली डाळ खिचडी हॉटेलसारखी होत नाही अशी अनेकांची तक्रार असते. डाळ खिचडी करण्याची सोपी रेसिपी आणि काही टिप्स पाहूया. (How To Make Hotel Style Dal Khichdi At Home)

हॉटेलमधील खिचडीसाठी डाळ आणि तांदूळ समप्रमाणात घेणं आवश्यक आहे. शक्यतो जुना बासमती तुकडा किंवा साधा बारीक तांदूळ वापरा. जो लवकर शिजेल आणि मऊ होईल. (Restaurant Style Dal Khichdi 7 Tips)

मूग डाळ, तूर डाळ आणि मसूर डाळ यांचे मिश्रण वापरल्यास चव अप्रतिम येते.डाळ आणि तांदूळ एकत्र करून ३० मिनिटं भिजवून ठेवा. यामुळे ते एकसमान आणि लवकर शिजतात. (Dal Khichdi Recipe)

खिचडी मऊ होण्यासाठी डाळ-तांदळाच्या एकूण प्रमाणाच्या तिप्पट पाणी वापरा.खिचडी शिजवताना फोडणीत हिंगाचा वापर केल्यास पचन सुधारतं आणि चवही चांगली येते.

डाळ खिचडीत खूप जास्त तूप घाला. हॉटेलमध्ये तूप भरपूर वापरले जाते. ज्यामुळे चव, टेक्स्चर दोन्ही सुधारतं.

खिचडी शिजल्यावर लगेच बाहेर काढू नका. कुकरची शिट्टी झाल्यानंतर गॅस मंद करून ५ ते १० मिनिटं मंद आचेवर शिजवा. याला दम देणे म्हणतात. ज्यामुळे हॉटेलसारखी मऊ आणि एकजीव होते.

खिचडी वाढण्यापूर्वी त्यावर तूप, जिरं, हिंग, कढीपत्ता, लसूण आणि सुक्या लाल मिरच्या वापरून तयार केलेला गरमागरम तडका घाला.