तळल्यानंतर फ्रेंच फ्राईज नरम पडतात? सोपी ट्रिक, पावसाळ्यातही खाता येतील कुरकुरीत फ्राईज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2025 18:35 IST2025-06-19T18:31:27+5:302025-06-19T18:35:28+5:30

potato fries crispy hack: best way to fry french fries: kitchen tips for crunchy snacks: घरी फ्रेंच फ्राईज करताना अनेकदा ते मऊ होतात, नरम पडतात आणि कुरकुरीत होत नाही. अशावेळी ही सोपी ट्रिक वापरल्यास विकतसारखी टेस्ट लागेल.

पावसाळ्यात आपल्याला अनेक चटकदार पदार्थ खाण्याची वारंवार इच्छा होते. वडापाव, भजी, पापडसारखे तळलेले पदार्थ खाऊन कंटाळा येतो. नवीन काही तरी ट्राय करावं असं आपल्याला वाटतं.(potato fries crispy hack)

बटाटा हा आपल्याला सर्वांचा आवडता. बटाट्याची भजी, कापं, वडे असे सर्व पदार्थ चवीने खातो. या सर्वांव्यतिरिक्त फ्रेंच फ्राईज हा सर्वांच्या आवडीचा स्नॅक्स. (best way to fry french fries)

घरी फ्रेंच फ्राईज करताना अनेकदा ते मऊ होतात, नरम पडतात आणि कुरकुरीत होत नाही. अशावेळी ही सोपी ट्रिक वापरल्यास विकतसारखी टेस्ट लागेल. (kitchen tips for crunchy snacks)

फ्राईज करण्यासाठी स्टार्चयुक्त बटाट्यांचा वापर करा. यासाठी आपण मोठे पांढरे बटाटे निवडायला हवे. हे लवकर शिजतात आणि तळल्यानंतर कुरकुरीत होतात.

बटाटे कापल्यानंतर तेलात टाकू नका. त्यांना ३० मिनिटे थंड पाण्यात भिजवा. ज्यामुळे त्यातील अतिरिक्त स्टार्च निघून जाईल. या पाण्यात थोडा व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घातला तर उत्तम.

बटाटे पाण्यातून काढल्यानंतर ते थोडा वेळ सुकवून घ्या. ज्यामुळे तेलात गेल्यानंतर मऊ पडणार नाही. बटाटे कोरडे करण्यासाठी त्याला स्वच्छ कापडाने पुसा.

फ्राईज कुरकुरीत करण्यासाठी तांदळाचे पीठ वापरा. तांदळाच्या पीठामध्ये कमी ओलावा असतो. ज्यामुळे फ्राईज कुरकुरीत तळले जातात.