शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

ओटी पोट सुटलंय-कंबर जाडजूड दिसते? ७ गोष्टी करा, महिन्यातभरात पोटाची चरबी होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 16:58 IST

1 / 8
ओटी पोटाची चरबी (Lower Body Fat) कमी करणं हे थोडं आव्हानात्मक असलं तरी योग्य सवय आणि सातत्यानं प्रयत्न केले तर तुम्ही सहज पोटावर साचलेली चरबी कमी करू शकता. (How To Lose Lower Body Fat)
2 / 8
आहारात साखर, मैदा आणि तळलेले पदार्थ पूर्णपणे टाळा. त्याऐवजी प्रोटीन्स आणि फायबर्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.
3 / 8
दिवसातून जवळपास ३ ते ४ लिटर पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात आणि चयापचन क्रिया सुधारते.
4 / 8
रोज किमान ३० ते ४० मिनिटं वेगानं चाला, धावा किंवा सायकलिंग करा यामुळे कॅलरीज वेगानं कमी होतात.
5 / 8
प्लँक, लेग रेजेस आणि क्रंचेस यांसारखे पोटाचे व्यायाम ओटी पोटाच्या स्नायूंना टोन करण्यास मदत करतात.
6 / 8
दिवसातून ७ ते ८ तासांची शांत झोप घ्या. झोप पूर्ण न झाल्यास शरीरात ताण-तणाव वाढतो आणि पोटाचा घेरसुद्धा वाढू लागतो.
7 / 8
जास्त स्ट्रेस शरीरात कोर्टिसोल हॉर्मोन्स वाढवतो. यामुळे पोटावर चरबी साठते. यासाठी योगा किंवा ध्यान करा.
8 / 8
रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान २ ते ३ तास आधी घ्या आणि जेवणानंतर थोडावेळ चालायला जा.
टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealthआरोग्यWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स