ब्लाऊज दंडात खूपच टाईट होतोय? ७ ट्रिक्स - एका मिनिटात परफेक्ट फिट! टेलरकडे जाण्याची-उसवण्याची झंझटच नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2026 18:00 IST2026-01-03T20:00:00+5:302026-01-05T18:00:23+5:30

how to loosen tight sleeves of blouse : tight blouse sleeves solution : easy hacks to loosen blouse sleeves : ब्लाऊज दंडाला टाईट होत असेल तर ब्लाऊजमध्ये, छोटे व आकर्षक बदल करून आपण तोच ब्लाऊज पुन्हा घालू शकतो...

साडी कितीही सुंदर असली तरी ब्लाऊज दंडाला खूप टाईट होत असेल, तर संपूर्ण लूक बिघडतो आणि हालचाल करणेही अवघड होते. अनेकदा ब्लाऊज एकदा शिवल्यानंतर हाताजवळ फारच घट्ट बसतो. अशावेळी पुन्हा ब्लाऊज शिवायला देणे किंवा बदल करणे शक्य नसते(how to loosen tight sleeves of blouse).

ब्लाऊजच्या बाह्या दंडाला टाईट होणे ही अनेक महिलांची मोठी (tight blouse sleeves solution) डोकेदुखी असते.अशावेळी ब्लाऊज कपाटांत तसाच ठेवून तो वापरला जात नाही किंवा नवीन न शिवता आहे त्याच ब्लाऊजमध्ये काही छोटे व आकर्षक बदल करून आपण तोच ब्लाऊज पुन्हा घालू शकतो.

अनेकदा ब्लाऊज शिवताना मापात चूक होते किंवा काही काळानंतर (easy hacks to loosen blouse sleeves) हाताचे दंड वाढल्यामुळे ब्लाऊजच्या बाह्या टोचू लागतात किंवा घट्ट होतात. अशावेळी संपूर्ण ब्लाऊज उसवण्यापेक्षा काही स्मार्ट 'जुगाड' करून तुम्ही तो पुन्हा घालण्यायोग्य करु शकता. पहा या खास ट्रिक्स!

ब्लाऊजच्या दंडाच्या खालच्या बाजूला एक छोटा स्लिट कट दिल्यास घट्टपणा लगेच कमी होतो. हा कट दिसताना एखाद्या डिझाइनसारखाच दिसतो त्यामुळे ब्लाऊजला एक वेगळाच हटके लूक देखील मिळतो आणि ब्लाऊज दंडाला घट्ट देखील होत नाही.

ब्लाऊजच्या बाहीला खालच्या बाजूने मध्यभागी थोडा कट द्यायचा आणि तिथे दोन्ही टोकांना 'नॉट' बांधायची. यामुळे बाहीला हवा तसा सैलपणा मिळतो. या बाह्यांना अधिक आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी तुम्ही साध्या गाठीऐवजी तिथे छोटे गोंडे किंवा सुंदर मोत्यांच्या लेसचा वापर करू शकता. यामुळे ब्लाऊज लूजही होईल आणि त्याला एक नवीन स्टायलिश लूकही मिळेल.

जर तुमच्या ब्लाऊजची बाही दंडाला खूपच घट्ट होत असेल, तर हे नेट फॅब्रिक तुम्हाला खूप मदत करू शकते. तुमच्या आवडीनुसार बाहीला मध्यभागी किंवा खालच्या बाजूला कट द्या आणि तिथे ब्लाऊजच्या रंगाशी जुळणारे नेट फॅब्रिक जोडा. जर तुम्हाला जास्त डिझाईन नको असेल, तर तुम्ही साध्या नेटचा वापर करू शकता. यामुळे बाहीचा घेर वाढेल, हाताला हालचाल करण्यासाठी पुरेशी जागा मिळेल आणि तुमच्या साध्या ब्लाऊजला एक डिझायनर लूक मिळेल.

दंडाच्या आतल्या किंवा बाहेरच्या बाजूला लेस जोडल्यास ब्लाऊज लूज होतो आणि दिसायलाही ट्रेंडी वाटतो.

दंडाच्या बाजूला फ्रंट किंवा साइड बटण डिझाइन केल्यास ब्लाऊज सहज लूज करता येतो.

बाह्या खूपच घट्ट असतील, तर त्या काढून टाका आणि कॉन्ट्रास्ट रंगाच्या किंवा नेटच्या नवीन बाह्या जोडा. आजकाल असा लूक ट्रेंडमध्ये आहे.

जर आत मार्जिन नसेल, तर बाह्यांच्या खालच्या बाजूला (काखेत) ब्लाऊजच्या रंगाचे त्रिकोणी कापड जोडा. यामुळे हाताला हवी तशी मोकळीक मिळते.