सतत स्ट्रेस येतो-चित्त थाऱ्यावर नसतं? मन शांत ठेवण्यासाठी १० गोष्टी करा, आनंदी राहाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 15:03 IST2026-03-18T14:41:44+5:302026-03-18T15:03:46+5:30
How To Keep Mind Calm : कोणाबद्दल राग किंवा द्वेष मनात ठेवून कोणाचं काहीही बिघडत नाही.

सकाळी उठल्यावर मोबाईल पाहण्याऐवजी १० ते १५ मिनिटं शांत बसा. प्राणायम किंवा ध्यान केल्यानं दिवस चांगला जाईल. (10 Tips For Keep Mind Calm And Positive)

अनेकदा आपण भूतकाळातील दु:ख किंवा भविष्याची चिंता करतो पण जे होऊन गेलं ते बदलता येत नाही. (How To Keep Mind Calm)

प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक व्यक्तीला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या क्षमते बाहेरच्या कामांना नाही म्हणायला शिका.

सतत इतरांचे आयुष्य सोशल मीडियावर पाहिल्यानं स्वत:ची तुलना आणि असंतोष निर्माण होतो.त्यामुळे दिवसाला काहीवेळ डिजिटल डिटॉक्ससाठी राखून ठेवा.

शरीर थकलेलं असेल तर मन कधीच शांत राहू शकत नाही. रोज किमान ७ ते ८ तास शांत झोप घ्या. सात्विक आहार घ्या.

मन दुसरीकडे वळवण्यासाठी आवडीचं पुस्तक वाचणं, गाणी ऐकणं किंवा एखादा छंद जोपासणं हा उत्तम उपाय आहे.

इतरांकडून अपेक्षा कमी ठेवा. लोक आपल्याशी कसं वागतील हे आपल्या हाताता नसतं. पण त्यांच्या वागण्यावर आपण कशी प्रतिक्रिया द्यायची हे आपल्या हातात असतं.

दिवसभरातून थोडा वेळ काढून बागेत फिरायला जा. निसर्गाशी जोडले गेल्यावर मनाचा ताण आपोआप कमी होतो.

कोणाबद्दल राग किंवा द्वेष मनात ठेवून कोणाचं काहीही बिघडत नाही पण आपलं मन अशांत राहतं म्हणून माफ करायला शिका.

तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी आहेत. त्याबद्दल ईश्वराचे आभार माना.. आपल्याकडे काय नाहीये याचा विचार कराल तर कायम चिंतेतच राहाल.

















