होळी खेळा बिनधास्त! केमिकल रंग ओळखण्याच्या ७ सोप्या ट्रिक- डोळे, केस राहतील सुरक्षित- सणाचा आनंद द्विगुणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2026 09:41 IST2026-02-25T18:00:00+5:302026-02-26T09:41:23+5:30

Holi safety tips: Chemical colors in Holi: Safe Holi colors: केमिकल रंग ओळखण्यासाठी ७ टिप्स लक्षात ठेवा. ज्यामुळे त्वचेला नुकसान होणार नाही.

भारतात होळी हा सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. होळी हा सण म्हणजे रंगांची उधळण, आनंद आणि उत्साह. पण मागच्या काही वर्षात या उत्साहाला केमिकल रंगांचे ग्रहण लागले आहे. पूर्वी नैसर्गिक रंगानी होळी खेळली जायची. पण आता अनेक केमिकल्स रंग बाजारात पाहायला मिळतात. ज्याचा आपल्या त्वचेवर वाईट परिणाम होतो. या रंगामुळे डोळ्यांना, केसांना आणि त्वचेला इजा होते.

केमिकल रंग ओळखण्यासाठी ७ टिप्स लक्षात ठेवा. ज्यामुळे त्वचेला नुकसान होणार नाही.

नैसर्गिक रंगांना फुलांसारखा किंवा मातीसारखा सुगंध असतो. जर रंगाचा वास इंजिन ऑईल, पेट्रोल किंवा रसायनांसारखा येत असेल तर यामुळे आपली त्वचा खराब होऊ शकते.

अनेक रंगांमध्ये काचेचे बारीक कण किंवा केमिकल मिसळलेले असतात, ज्यामुळे ते चमकतात. हे रंग सूर्यप्रकाशात जास्त चमकत असतील तर विकत घेऊ नका. यामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते.

रंग खरेदी करताना थोडासा रंग पाण्यात टाकून पाहा. नैसर्गिक रंग पाण्यात पूर्णपणे विरघळतात किंवा तळाला जाऊन जमा होतात. केमिकल रंगांचे पाणी तेलकट होते.

नैसर्गिक रंग लगेच निघतात. यासाठी कोरड्या हातावर रंग घासा आणि साबणाने धुतल्यानंतरही निघत नसेल तर तो वापरु नका.

गुलाल खरेदी करताना तो हातावर चोळून बघा. मऊ आणि पिठासारखा लागत असेल तर खरेदी करा. दाणेदार आणि वाळूसारखा लागत असेल तर त्यात केमिकल असू शकतात.

रंग खरेदी करण्यापूर्वी त्यावर ISI आणि Eco-friendly लेबल तपासा. Natural आणि Organic मधील फरक तपासा.

केमिकल रंगांमुळे कागदावर तेलकट किंवा राखाडी डाग पडतात. नैसर्गिक रंग कागदाला खराब करत नाहीत.