थंडीत घरीच वाढवा मस्त वेलचीचं रोप; छोट्या कुंडीत 'असं' रोप लावा; टोपलीभर वेलच्या येतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 12:40 IST2025-12-04T12:19:05+5:302025-12-04T12:40:02+5:30

How To Grow Cardamom Plant At Home : हिवाळ्यात रोपाला जास्त पाणी देणं टाळा. माती कोरडी झाल्यावरच पाणी द्या.

वेलचीचं रोप उष्ण आणि दमट हवामानात चांगलं वाढत त्यामुळे हिवाळ्यात त्याची विशेष काळजी घेणं महत्वाचे आहे.त्यात तुम्ही घरात हे रोप लावणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. (How To Grow Cardamom Plant At Home)

हिवाळ्यात रोपाला जास्त पाणी देणं टाळा. माती कोरडी झाल्यावरच पाणी द्या. साधारणपणे दर २ दिवसांनी एकदा पाणी देणं पुरेसं असतं. जास्त पाण्यामुळे मुळं कुजण्याची शक्यता असते.

वेलचीला थेट कडक सुर्यप्रकाश सहन होत नाही. दिवसातून काही तास मंद किंवा फिल्टर केलेला सुर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा. जसं की खिडकीजवळ किंवा बाल्कनीतील सावलीत.

रोपासाठी १५ ते ३५ अंश सेल्सियस तापमान योग्य असते. थंडीच्या लाटांपासून किंवा खूप कमी तापमानापासून रोपाचे संरक्षण होईल असे पाहा.

पाण्याचा निचरा होणारी चांगली माती वापरा. हिवाळ्यात रोपाची वाढ मंदावते.त्यामुळे खत देण्याचे प्रमाण कमी करा. वर्षातून दोन ते तीन वेळा सेंद्रीय खत देणं पुरेसं आहे.

रोपाभोवतीची हवा थोडी दमट ठेवण्याचा प्रयत्न करा. रोपाला चांगला आकार देण्यासाठी पानांची वाढ कशी होते आहे याकडे लक्ष द्या.

खराब झालेली पानं काढून टाकण्यासाठी वेळोवेळी छाटणी करा.