चेहरा गोरा पण मान काळवंडलीये? ७ टिप्स, मानेचे काळे थर दूर होतील-सुंदर दिसेल मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 17:22 IST2026-04-01T17:06:43+5:302026-04-01T17:22:50+5:30
How To Get Rid Of Dark Neck : अंघोळ करताना नियमित मान घासून स्वच्छ करा नंतर मॉईश्चरायजर लावायला विसरू नका.

मानेचा काळे पणा घालवण्यासाठी बेसन, दही आणि चिमूटभर हळद यांची पेस्ट तयार करून मानेवर लावा आणि २० मिनिटांनी धुवा. (How To Remove Neck Darkness)

बटाट्याच्या रस नैसर्गिक ब्लीचसारखे काम करतो. रोज १० ते १५ मिनिटं मानेवर बटाट्याचा रस लावून ठेवा. (How To Get Rid Of Dark Neck)

दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीच्या गरानं मानेला मसाज केल्यानं त्वचा उजळते.

लिंबाचा रस आणि मध एकत्र करून लावल्यानं साचलेली घाण आणि टॅनिंग निघून जाण्यास मदत होते.

आठवड्यातून दोनदा तांदळाचे पीठ किंवा कॉफी वापरून मानेची त्वचा स्क्रब करा.

अंघोळ करताना नियमित मान घासून स्वच्छ करा नंतर मॉईश्चरायजर लावायला विसरू नका.

भरपूर पाणी प्या आणि आहारात फळाचा समावेश करा. जेणेकरून त्वचा आतून निरोगी राहील.

चेहऱ्याला सनस्क्रीन लावता तेव्हा मानेलाही सनस्क्रीन लावा. ज्यामुळे चेहऱ्याचा आणि मानेचा रंग सारखा दिसेल.

















