Korean Glass Skin : आठवड्यातून एकदा चेहऱ्याला 'असा' लावा मधाचा फेसपॅक, पिंपल्स -मुरुमे होतील कमी, चेहरा चमकेल कोरियन तरुणींसारखा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2025 09:30 IST2025-09-20T09:30:00+5:302025-09-20T09:30:02+5:30
korean glass skin tips: honey face pack for glowing skin: natural pimple remedy: आपल्यालाही कोरियन त्वचा हवी असेल तर किचनमध्ये मिळणारा साधा मध आपल्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतो.

आपल्या प्रत्येकाला त्वचा सुंदर आणि तजेलदार हवी असते. सुंदर त्वचेचासाठी आपण महागडे क्रीम, फेसवॉश वापरतो पण यामुळे फारसा काही फरक पडत नाही. (korean glass skin tips)
कोरियन तरुणींची त्वचा अतिशय नितळ आणि सुंदर असते. आपल्यालाही अशी त्वचा हवी असेल तर किचनमध्ये मिळणारा साधा मध आपल्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतो. यामुळे चेहऱ्यावरील मुरुमे कमी होतात आणि त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळेल. (honey face pack for glowing skin)
कोरियन त्वचा मिळवण्यासाठी आपल्याला मध आणि कोरफडीचा गर एकत्र करावा लागेल. चमचाभर मध आणि चमचाभर कोरफडीचा गर घ्या. याची पेस्ट बनवून त्वचेवर लावा.
१५ ते २० मिनिटानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. यामुळे त्वचा स्वच्छ होईल. आपण असं आठवड्यातून एकदा केले तर त्वचा चमकण्यास मदत होईल.
मधामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म त्वचेला खोलवर स्वच्छ आणि हायड्रेट करतात.
कोरफडीचा गर त्वचेला शांत करुन पोषण देते. ज्यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते. यामुळे त्वचेवरील कोरडेपणा दूर होईल.