काळी पडून कोळशासारखी झालेली कढई होईल नव्यासारखी लख्खं- चकचकीत, बघा सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2025 11:25 IST2025-10-02T11:24:22+5:302025-10-02T11:25:01+5:30

सणावाराचे दिवस असले की सतत काही ना काही तळलेले पदार्थ केले जातात. आता नवमी, दसरा या सणांच्या निमित्तानेही घरोघरी काहीतरी तळण होणारच..(how to clean iron pan or iron kadai)

पुढे काही दिवसांतच दिवाळी आहे. तेव्हा तर शंकरपाळे, चकली, शेव, अनारसे, करंजी असे वेगवेगळे पदार्थ केले जातात. असे वारंवार तळण झाले की मग कढयांना काळपट रंग चढायला लागतो आणि मग काही दिवसांतच त्या कळकट, घाण दिसायला लागतात.

अशा काळपट रंग चढलेल्या कढई कमीतकमी वेळेत आणि कमीतकमी मेहनतीत स्वच्छ करायच्या असतील तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून पाहा.

हा उपाय करण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढईमध्ये पाणी घाला. त्या पाण्यामध्येच थोडेसे मीठ घाला.

यानंतर त्या पाण्यातच १ चमचा आमचूर पावडर घाला. आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्या. १० ते १२ मिनिटे पाणी चांगलं उकळू द्या.

यानंतर गॅस बंद करा. पाणी थंड झालं की ते बाहेर टाकून द्या आणि डिशवॉश लिक्विड घालून कढई तारेच्या घासणीने घासून काढा. पुढच्या काही मिनिटांतच ती अगदी चकाचक होईल.