न धुता पाय पुसणी स्वच्छ करण्याची खास ट्रिक; मळकट, काळी पायपुसणी दिसेल स्वच्छ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 13:16 IST2025-09-23T12:47:59+5:302025-09-24T13:16:02+5:30

How To Clean Doormat Without Washing : जर पायपुसणीवर काही डाग पडले असतील, तर ते काढण्यासाठी लिंबू आणि मीठाची पेस्ट वापरू शकता.

घर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि बाहेरील धूळ घरात येऊ नये. यासाठी लोक पायपुसण्यांचा वापर करतात. पायपुसणे स्वच्छ नसेल तर पूर्ण घर खराब दिसू शकतं. पाय पुसणी न धुता स्वच्छ करण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया.(How To Clean Doormat Without Washing)

पायपुसणीला बाहेर नेऊन जोरदार झटका.यामुळे त्यामध्ये अडकलेली धूळ,माती आणि केस निघून जातील,आत अडकलेला बारीक कचराही बाहेर पडेल.

जर तुमच्याकडे व्हॅक्यूम क्लीनर असेल, तर त्याचा वापर पायपुसणी स्वच्छ करण्यासाठी खूप प्रभावी ठरतो. पायपुसणी जमिनीवर पसरवा आणि व्हॅक्यूम क्लीनरने स्वच्छ करा.

पायपुसणीतील दुर्गंधी आणि वास काढण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा किंवा कोरड्या डिटर्जंट पावडरचा वापर करू शकता.

जर पायपुसणीवर काही डाग पडले असतील, तर ते काढण्यासाठी लिंबू आणि मीठाची पेस्ट वापरू शकता.

तुमच्या पायपुसणीला जर वास येत असेल किंवा ती खूप घाण दिसत असेल, तर कोरडा शॅम्पू किंवा कार्पेट क्लिनर वापरा.

जर पायपुसणीवर मातीचे किंवा चिखलाचे डाग असतील, तर तुम्ही ब्रश आणि डिटर्जंट फोम वापरून पायपुसणी स्वच्छ करू शकता.