Winter Care: सर्दीमुळे घसा दुखतोय- आवाज बसला? सोपा घरगुती उपाय- काही मिनिटांत आराम मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2025 09:40 IST2025-12-12T09:38:34+5:302025-12-12T09:40:02+5:30

बऱ्याचदा असं होतं की थंडीचा कडाका वाढला की सर्दी होते. सर्दी होण्याच्या आधी काही जणांचा घसा खूप दुखतो.

सर्दीनंतरही घसा दुखणं, आवाज बसणं असा त्रास होतोच. हा त्रास कमी करण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय करून पाहा.

हा उपाय करण्यासाठी एक लिंबू घ्या आणि ते गॅसवर ठेवून सगळीकडून व्यवस्थित भाजून घ्या.

भाजलेलं लिंबू थोडं थंड झाल्यानंतर ते मधोमध कापा आणि त्याचा रस काढून घ्या.

आता एका चमच्यात लिंबाचा रस घ्या आणि त्यामध्ये मीठ घाला.

भाजलेल्या लिंबामधले बदललेले गुणधर्म आणि मीठ या दोन्हींमधले घटक एकत्र येतात आणि ते घशासाठी अतिशय उपयुक्त ठरतात.

हा उपाय दिवसातून दोन वेळा नियमितपणे करा. काही दिवसांतच आराम मिळेल. घसा दुखणं थांबेल.