Holi Special Rangoli: होळीच्या दिवशी घरासमोरही करा रंगांची उधळण, १२ युनिक रांगोळी डिझाईन्स..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2025 15:20 IST2025-03-12T15:12:21+5:302025-03-12T15:20:06+5:30
Happy Holi Rangoli Designs for Office, Home Decoration

होलिका दहन जिथे करणार आहात तिथे किंवा मग त्यादिवशी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर तुम्ही हे काही रांगोळी डिझाईन्स काढू शकता..
ही एक सुंदर रांगोळी पाहा.. अर्थात ही काढण्यासाठी तुम्हाला थोडा जास्त वेळ द्यावा लागेल..
संक्रांतीला आणलेले सुगडे घरात असतील तर त्यांचा असा वापर करून तुम्ही होळी स्पेशल रांगोळी काढू शकता.
सुगडे नसतील तर असे सुरेख मडके काढून सुंदर रांगोळी काढता येईल.
राधा- कृष्णाची गोकुळातली होळी तर आपण आजवर बऱ्याचदा गोष्टींमधून ऐकत आलो आहोत.. त्याच थीमवर तुम्ही अशी रांगोळी काढू शकता.
हे एक सगळ्यात सोपं डिझाईन. हवे तसे रंग भरा आणि मधोमध होळीच्या शुभेच्छा देणारा एखादा मेसेज लिहा. सुंदर रंगोळी झाली तयार.
अशा पद्धतीने होलिका दहनचा देखावा तुम्हाला तुमच्या रांगोळीतून अगदी तंतोतंत दाखवता येईल.. अशी रांगोळी पाहून सगळेच तुमचं कौतूक करतील..
पिचकाऱ्यांशिवाय लहानग्यांची होळी नाहीच.. त्यामुळेच त्या पिचकाऱ्यांची रांगोळीही तुम्ही या पद्धतीने काढू शकता.
होळी स्पेशल रांगोळी काढण्यासाठी हे एक अतिशय सोपं आणि झटपट होणारं रांगोळी डिझाईन.
ही रांगोळी दिसायला मोठी वाटत असली तरी ती काढायला अजिबात वेळ लागत नाही. खूप झटपट ही रांगोळी काढून होऊ शकते..
अतिशय सोपी आणि दिसायला खूपच आकर्षक असणारी ही एक रांगोळी पाहा. अगदी पाहताक्षणीच प्रत्येकाचं लक्ष वेधून घेईल.