हेल्दी टिफिन, हॅपी किड्स! मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी ७ पदार्थ, भरपूर प्रोटीन खाऊन होतील तंदुरुस्त- झटपट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2026 18:00 IST2026-02-19T18:00:00+5:302026-02-19T18:00:03+5:30

healthy school tiffin: kids lunch box ideas: protein rich foods for kids: मुलांना टिफिनमध्ये देता येणारे ७ हेल्दी पदार्थ पाहूया. ज्यामुळे ते डबाही खातील आणि त्यांना पोषणही भरपूर मिळेल.

मुलांच्या डब्यात आज काय द्यायचं हा प्रश्न प्रत्येक आईच्या समोर रोज असतो. पोहे, उपमा किंवा आवडीचे पदार्थ दिले नाही की डबा तसाच रिटर्न येतो. तर दुसरीकडे मॅगी किंवा बिस्किटांसारखे पर्याय आरोग्यासाठी घातक ठरतात. वाढत्या वयातील मुलांना केवळ चविष्टच नाही तर त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी पोषक घटकांची आवश्यकता जास्त असते. (healthy school tiffin)

मुलांना टिफिनमध्ये देता येणारे ७ हेल्दी पदार्थ पाहूया. ज्यामुळे ते डबाही खातील आणि त्यांना पोषणही भरपूर मिळेल. (kids lunch box ideas)

मिनी चीज उत्तप्पा हा १० ते १५ मिनिटात होणारा पदार्थ आहे. आपण यात विविध भाज्या, गाजर, टोमॅटो घालून त्याला अधिक टेस्टी करु शकतो. सॉससोबत मुले आवडीने खातील.

अनेकदा मुले चपाती खात नाही. अशावेळी आपण मुलांना पनीर पराठा खाऊ घालू शकता. चपातीमध्ये किसलेले पनीर, कांदा आणि मसाले घाला. दही, चटणी किंवा कोशिंबीरसोबत मुलांना खाऊ घाला.

भरपूर भाज्या घालून आपण शेवयांचा उपमा करु शकतो. यात गाजर, कोबी, कांद्याची पात, बीन्स, हिरवे वाटाणे, कांदा, टोमॅटो घालून याची चव दुप्पट करता येते.

मुलांना चीज सॅण्डविच खायला जास्त आवडते. हे बनवण्यासाठी आपण मल्टीग्रेन किंवा ब्राऊन ब्रेड घेऊ शकतो. यावर चीज, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घालता येईल.

पनीर पुलाव हा अधिक प्रोटीनयुक्त पदार्थ आहे. यात विविध भाज्या घाला. पनीर शॅलो फ्राय करुन घाला. वरुन उकडलेला तांदूळ घालून त्याची चव अधिक वाढवता येते.

मुलांना भाज्या खायला आवडत नसतील तर पराठा रॅप तयार करा. पनीर, उकडलेल्या बटाट्याचे स्टफिंग तयार करुन त्यात विविध भाज्या घाला. सर्व साहित्य चपातीमध्ये भरुन त्याला रॅप करा. तव्यावर तूप घालून हा रॅप दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या.

मुलांना इडल्या खूप आवडतात. इडलीच्या बॅटरमध्ये आपण कांदा, किसलेला गाजर, पालक घालू शकतो. नाचणी-बाजरीची पौष्टिक इडली देखील करता येते.