Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 16:52 IST2025-07-30T16:45:09+5:302025-07-30T16:52:06+5:30

Health Tips: मांड्या कपड्यांमुळे झाकलेल्या असल्या तरी नेहमी होणाऱ्या घर्षणामुळे त्या भागाची त्वचा कोरडी पडते, रखरखीत होते आणि काळवंडते. त्यावर तात्पुरते उपाय न शोधता ही समस्या कायमची सोडवता आली तर? याबाबत वैद्यकीय तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊ.

मांड्या काळवंडणे ही समस्या केवळ सौंदर्याशी संबंधित विषय नाही, तर आरोग्याबाबत निर्देश करणारी बाब आहे. डॉक्टर सांगतात, हॉर्मोनल बदल हे मुख्य कारण आहे. जेव्हा मुली पौगंडावस्थेत प्रवेश करतात किंवा महिला मासिक पाळी, गर्भधारणा, स्तनपान, पीसीओडी किंवा दीर्घकाळ गर्भनिरोधक गोळ्या घेतात तेव्हा हार्मोनल पातळीत चढ-उतार होतात. यामुळे मांड्यांची त्वचा काळी पडू शकते.

दुसरे मोठे कारण म्हणजे कपड्यांमुळे होणारे घर्षण. जेव्हा वजन वाढते तेव्हा मांड्या एकमेकांवर घासतात आणि यामुळे रंग गडद होऊ शकतो. तसेच, घट्ट अंडरवेअर किंवा नायलॉन/लेस सारख्या कापडांचा वापर देखील हानिकारक ठरतो.

प्युबिक हेअर काढण्याच्या पद्धती देखील ही समस्या वाढवतात. केस काढण्याच्या क्रीममध्ये असलेले रसायन त्वचेला जाळू शकतात. वॅक्सिंगमुळे त्वचेचे नुकसान आणि संसर्ग होऊ शकतो, तर शेव्हिंगमुळे वाढलेल्या केसांची समस्या वाढते.

त्याचप्रमाणे जास्त घाम येण्याने तो भाग बुरशीजन्य आणि बॅक्टेरियाचा संसर्ग होऊन काळवंडू शकतो. यामुळे खाज सुटणे, जळजळ होणे आणि रंग गडद होणे असे प्रकार घडतात. बरेच लोक या भागात टॅल्कम पावडर लावतात, परंतु यामुळे ऍलर्जी आणि काळेपणा वाढू शकतो. ही समस्या मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये देखील अधिक दिसून येते.

पावडर वापरणे थांबवा, दररोज कडुलिंबाच्या अँटीसेप्टिक साबणाने हा भाग धुवा, घट्ट आणि नायलॉन कपड्यांऐवजी सुती आणि सैल कपडे घाला, प्युबिक हेअर काढण्यासाठी ट्रिमर वापरा, क्रीम, शेव्हिंग आणि वॅक्सिंग टाळा.

बरेच लोक या संवेदनशील भागावर लिंबू, दही, बेकिंग सोडा असे स्क्रब लावण्याची शिफारस करतात, परंतु तज्ञ ते योग्य मानत नाहीत. या गोष्टींमुळे ऍलर्जी आणि जळजळ होऊ शकते. पण एक सुरक्षित उपाय आहे. १ चमचा शुद्ध खोबरेल तेलात १/४ चमचा हळद मिसळा आणि हे मिश्रण मांड्यांच्या आतल्या भागात लावा. खोबरेल तेलाने त्वचेला थंड करते आणि मॉइश्चरायझ करते, तर हळद एक नैसर्गिक अँटीसेप्टिक आहे.

अशा परिस्थितीत, रात्री २% निझरल लोशनने भाग धुवा आणि क्वाड्रिडर्म आरएफ क्रीम लावा. १५-२० दिवसांसाठी क्रीम लावा आणि एका महिन्यासाठी लोशनने स्वच्छ करा. या दोन्ही गोष्टी मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध आहेत. पण तुमची स्किन सेन्सेटिव्ह असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

त्वचा काळी पडणे ही एक सामान्य समस्या आहे, परंतु त्यामागील कारणे समजून घेणे आणि योग्य उपाय अवलंबणे खूप महत्वाचे आहे. घरगुती उपाय वापरण्यापूर्वी, तुमची त्वचा किती संवेदनशील आहे हे जाणून घ्या आणि कोणताही उपाय वापरताना स्वच्छता आणि खबरदारी घेण्यास विसरू नका.