केसगळती-अपचनावर हमखास असरदार उपाय; तुळशीची ४ पानं खा-शरीरात होतील चमत्कारिक बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 13:03 IST2025-09-09T12:52:40+5:302025-09-09T13:03:56+5:30
तुळस आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जाते. दररोज ३-४ पानं खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

तुळस आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जाते. दररोज ३-४ पानं खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. आजारपणात डॉक्टरही तुळशीची पानं खाण्याचा सल्ला देतात. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया...
तुळस पचनक्रिया निरोगी ठेवते. गॅस, अॅसिडिटी आणि अपचन यासारख्या पोटाच्या समस्या कमी करते.
अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्सने समृद्ध असलेली तुळस शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. शरीरीराला संसर्गाशी लढण्यास मदत करते.
तुळस इन्सुलिनची पातळी नियंत्रित करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते खूप फायदेशीर आहे.
तुळशीमधील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचा स्वच्छ करते आणि त्वचेवरील डाग देखील कमी होतात. बरेच जण तुळशीच्या फेस पॅकचा वापर करतात.
तुळस केसांची मुळं मजबूत करून केस गळण्याची समस्या कमी करते. केसगळतीवर हा रामबाण उपाय आहे.
दररोज तुळशीची ३-४ पानं खाल्ल्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होतं आणि हृदयरोगाचा धोका देखील कमी होतो.
डोकेदुखी कमी करण्यासाठी तुळशीचं सेवन फायदेशीर ठरतं. तुळशीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि पेन रिलीविंग प्रॉपर्टीज आहेत, ज्यामुळे खूप आरामदायी वाटतं.
जेव्हा तुम्ही तुळशीची पानं चावता तेव्हा त्यातील गुणधर्म हे वेदनांपासून आराम देतात. यासाठी ३-४ तुळशीची पानं खा. मनालाही आराम मिळेल आणि शरीरातही चमत्कारिक बदल दिसतील.