Happy Women's Day 2026 Quotes: तुमच्या आयुष्यातील स्पेशल ‘तिला’ जागतिक महिला दिनानिमित्त द्या खास शुभेच्छा, मनापासून खास तिच्यासाठी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2026 15:37 IST2026-03-07T15:16:06+5:302026-03-07T15:37:27+5:30

Happy Women's Day 2026 Quotes in Marathi: जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छा म्हणजे कोरडे शब्द नसतात, कॉपी पेस्ट केलेले. त्या मनापासून द्याव्या. ‘तिला’ सांगावं मनापासून, तु आहेस म्हणून आम्ही आहोत.

आला फॉरवर्ड दिलं ढकलून, केली थट्टा अशा शुभेच्छा काय कामाच्या? तिला थोडी मदत, ताजा गरम वाफाळता चहा, एख‌ादा गजरा, प्रेमानं धरलेला हात.. हे ही शब्दांपेक्षा बोलकं असतं..

तू अशी तू तशी तू त्यागमूर्ती या अपेक्षांच्या ओझ्यातून करायला हवी तिची सुटका. ती जे मायेनं करते त्याची कदर केली तर तिच्या कष्टांचं मोल होतं असं तिला वाटतं. ती कदर महत्वाची..

आदर द्यावा आणि घ्यावा. ज्या घरात तिचा आदर, ज्या घरात तिचा सन्मान ते घर जपतं घरपण. वेगळं काही नको असतं, हवा असतो जरासा प्रेमाचा आधार.

मायेनं तिच्यासाठी आपण काय करतो, तिला काय आवडतं, तिचं काय नावडतं? घरात माहिती असतं का कुणाला? तिची आवड पूर्ण करायला सवड काढणार का कुणी हा असतो खरा प्रश्न.