हनुमान जयंती : मंदिरासमोर काढता येईल ८ सुंदर रांगोळ्या, काढायला सोप्या आणि दिसतात सुंदर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2025 17:06 IST2025-04-11T16:52:51+5:302025-04-11T17:06:54+5:30
Hanuman Jayanti Rangoli Design : Hanuman Jayanti Special Rangolis : Hanuman jayanti special rangoli design : मंदिरात हनुमान जयंतीचा उत्सव असेल तर या खास प्रसंगी काढा शोभून दिसेल अशी रांगोळी...

हनुमान जयंती संपूर्ण महाराष्ट्रभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हनुमान जयंती (Hanuman Jayanti Special Rangolis) निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या हनुमान मंदिरात उत्सव साजरा केला जातो.
कोणत्याही प्रकारचा उत्सव म्हटला की रांगोळी आलीच. यंदा तुमच्याही घराजवळील मंदिरात हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जात असेल, तर या खास प्रसंगी शोभून दिसेल अशा काही आकर्षक रांगोळी डिझाईन्स पाहूयात.
१. तुम्ही अशा प्रकारे रांगोळीत हनुमानाची गदा दाखवून त्याभोवती वेगवेगळ्या डिझाईन्सची रांगोळी काढू शकता.
२. रांगोळीत हलकीशी नाजूक डिझाईन्स काढून तुम्ही त्यात जय हनुमान असे लिहून रांगोळी अधिक आकर्षक करु शकता.
३. रांगोळी नसेल तर तुम्ही नागवेलीची पानं आणि गुलाबाच्या पाकळ्या तसेच रंगीबेरंगी फुलांच्या मदतीने देखील अशी सुंदर रांगोळी काढू शकता.
४. मारुतीस्त्रोत्रातील श्लोक रांगोळीत लिहून तुम्ही रांगोळी अधिक सुंदर आणि आकर्षक करु शकता.
५. जर तुमच्याकडे रांगोळी काढायला मोठी जागा असेल तर तुम्ही अशा प्रकारे जय हनुमान लिहून त्याभोवती मोठी संस्कारभारती रांगोळी काढू शकता.
६. रांगोळीत दिव्यांची सजावट करून अशा प्रकारची गोलाकार वेगवेगळ्या डिझाईन्सची रांगोळी काढू शकता.
७. गोलाकार रांगोळीच्या आत केशरी रंग भरून त्यावर जय हनुमान असे लिहून बाजूने गोपदक काढून सुरेख अशी रांगोळी काढू शकतो.
८. हनुमानाची गदा, शेपूट, टिळा, भगवा झेंडा अशा वेगवेगळ्या गोष्टी रांगोळीत दाखवून सुबक आणि सुरेख अशी रांगोळी काढू शकतो.