हातही दिसतात सुंदर, फक्त योग्य बांगड्या निवडा - पाहा साडी ते जिन्स कशावर काय सुट होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2026 15:00 IST2026-02-13T14:54:12+5:302026-02-13T15:00:43+5:30

Hands also look beautiful, just choose the right bangles - see what goes well with everything from sarees to jeans : विविध प्रकारच्या बांगड्या पाहा.

साडीवर आणि इतर ड्रेसवर सारख्याच बांगड्या सुट करत नाहीत. पाहा विविध प्रकार जे नक्कीच सुंदर दिसतात.

आजकाल कॉटनची साडी पुन्हा ट्रेंडींग आहे. या साध्या एकरंगी साड्यांवर क्राफ्टेड किंवा डिझाइनर बांगड्या फार सुंदर दिसतात.

भरपूर बांगड्या भरायला आवडत नाहीत? मग हा प्रकार अगदी तुमच्यासाठीच. हातात नाजूक सुंदर असं कडं घाला. घालायलाही सोपं असतं. दिसतंही रॉयल.

आता मल्टीउज बांगड्याही मिळतात. म्हणजे फक्त साडीसाठीच नाही तर ड्रेस, कुर्ता किंवा इतरही कपड्यांसोबत साजेसे दिसतील असे प्रकार.

वेस्टर्न वेअरवरही सुट होणारे काही प्रकार असतात. जिन्स घातल्यावर हातात आपण काही घालत नाही. पण हा कड्याचा प्रकार खास अशाच कपड्यांसोबत घालण्यासाठी आहे.

काही तुर्कीश डिझाइन आता ट्रेंडींग आहेत. त्यावर सुंदर चित्र आणि रंग असतात. नाजूक , छान असा हा प्रकार आरामात बाजारात मिळेल.

ब्रेसलेट्सचे विविध प्रकार असतात. त्यापैकी हा प्रकार वर्षानुवर्षे वापरला जात आहे. जरा वेगळ्या आकारामुळे तो लोकप्रिय ठरतो.