लग्नसोहळ्याची सुंदर आठवण-पुरुषांसाठी कमी वजनाचं सुंदर ब्रेसलेट! मुलगा-जावयासाठीचा खास दागिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2025 17:58 IST2025-12-10T14:56:53+5:302025-12-10T17:58:52+5:30

लग्नसराईच्या निमित्ताने जावयासाठी, मुलासाठी सोन्याचं ब्रेसलेट घेण्याचा विचार करत असाल तर कमी वजनात मिळणाऱ्या ब्रेसलेटचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत...

हे ब्रेसलेट हातामध्ये अगदी शोभून दिसतात आणि त्यामुळे पुरुषांच्या हाताला एक वेगळाच लूक येतो.

अगदी रोजच्या वापरासाठीही अशा पद्धतीचे ब्रेसलेट छान आहेत.

महिलांचे कडे किंवा ब्रेसलेट असले की त्यावर जसे दोन हत्ती असतात तसंच या कड्यावर दोन वाघ आहेत. त्यामुळे याचा लूक एकदम वेगळा वाटतो.

रुद्राक्ष आणि सोनं यांचं काॅम्बिनेशन हवं असेल तर या पद्धतीचं ब्रेसलेट घेऊ शकता.

सोन्याच्या कड्याचा लूक देणारं हे ब्रेसलेटचं हे एक साधं आणि सोबर डिझाईन पाहा. ज्यांना खूप फॅन्सी दागिने आवडत नाहीत, त्यांच्यासाठी हे उत्तम आहे.

हाताला भारदस्तपणा देणारं ब्रेसलेट डिझाईन पाहात असाल तर अशा पद्धतीचं ब्रेसलेट घेण्यास प्राधान्य द्या.

अशा पद्धतीचं स्टोन लावलेलं ब्रेसलेटही सोनाराकडे मिळतं. तुम्हाला आवडत असेल आणि बजेट असेल तर एखादा हिरा लावूनही तुम्ही ब्रेसलेट घेऊ शकता.