तब्बल ७३८ दिवस ती झाडावरच राहिली, झाडं तोडणारी माणसं शेवटी हरलीच कारण..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2025 13:47 IST2025-02-17T13:34:58+5:302025-02-17T13:47:31+5:30
girl lived on the tree for 738 days : भेटा लेडी टारझनला, झाडं जगवा म्हणत ती गप्प बसली नाही तर झाडावरच जाऊन राहिली..

'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे' असं म्हणतं अनेकांनी वृक्षतोड, जंगलतोड यांविरूद्ध आंदोलने केली आहेत. विविध उपक्रमांसाठी झाडे तोडली जातात. पण त्याचा अत्यंत वाईट परिणाम पर्यावरणावर होतो.
लोक झाडांभोवती उभे राहून, पोलीसात तक्रार नोंदवून, न्यायालयात खटले चालवून आंदोलने करतात. हे आपण पाहीले आहे.
पण या अमेरिकन महिलेने पत्करलेला मार्ग फारच वेगळा आणि साहसी आहे. 'ज्युलीआ बटरफ्राय हील' असे या महिलेचे नाव आहे. ती पर्यावरण संरक्षक म्हणून कार्यरत आहे.
१९९७ मध्ये पॅसिफिक लंबर कंपनी या उद्योजक संस्थेला एका प्रकल्पाअंतर्गत, १ हजार वर्ष जुने कॅलिफॉर्निया रेडवुड प्रजातीचे झाड तोडायचे होते. पण ज्युलीआने त्यासाठी तिचा विरोध दर्शवला.
तिच्या बोलण्याने ते थांबणार नव्हते. म्हणून तिने त्या झाडावरतीच स्वत:च घर बांधून त्यात रहायला सुरवात केली. ६ बाय ४ च्या जागेत तिने रहायला सुरवात केली. झाडाची उंची २००फुट होती. हवा, वादळ, पाऊस कशाचाही विचार न करता ज्युलीआने तिचे आंदोलन सुरू केले.
तिने एका आठवड्यासाठी त्या झाडावर राहण्याचे ठरवले. पण बघता-बघता तब्बल ७३८ दिवस ती त्या झाडावर राहिली. त्या झाडाला तिने लुना असे नाव दिले.
लोकांनी आणि इतर कार्यकर्त्यांनी तिला मदत केली. जेवण नेऊन दिले. पाणी दिले. तिला लागणार्या सर्व वस्तूंचा पुरवठा लोकांनी केला.
सोलरवर चालणाऱ्या यंत्रांचा वापर करून ज्युलीआ त्या जंगलात राहिली. मिडियाशी सतत संपर्कात राहून ती लोकांना उपदेश करत होती. अनेकांनी तिला सहकार्य केले.
१९९९ साली तिच्या कष्टांना यश मिळाले. पेसिफिक लंबर कंपनीने लुना झाड आणि इतरही झाडे न तोडण्याचे आश्वासन दिले.
ज्युलीयाचे हे योगदान जगभरातील पर्यावरण संरक्षकांसाठी प्रेरणादायी ठरले. ती एक नामवंत ॲक्टिव्हिस्ट तर आहेच. पण ती एक लेखिकाही आहे.