Garba Special Shoes: दांडिया स्पेशल बुटांचे खास डिझाईन्स, कितीही खेळा पाय दुखणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2025 16:53 IST2025-09-19T16:45:48+5:302025-09-19T16:53:01+5:30

गरबा, दांडिया खेळताना पायात काय घालावं असा प्रश्न पडतोच. कारण आपले फुटवेअर हे खूप आरामदायीही असायला हवे, शिवाय आपल्या ड्रेसिंगवर सूट व्हायला हवे. म्हणूनच आता पुढे असलेले गरबा- दांडिया स्पेशल बुटांचे काही लेटेस्ट डिझाईन्स पाहा..

अशा पद्धतीच्या गरबा- दांडिया फुटवेअरची सध्या प्रचंड क्रेझ असून ते अतिशय आरामदायी आहेत.

गरबा- दांडिया खेळताना हे बूट घातल्यास बुटांची ग्रीप व्यवस्थित राहाते शिवाय त्या बुटांचे कुशनिंग उत्तम असल्याने पाय दुखत नाहीत.

अशा पद्धतीचे कित्येक नवनविन प्रकार सध्या बाजारात आलेले आहेत.

ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही तुम्ही अशा पद्धतीचे बूट मागवू शकता.

जर तुम्ही खूप गरबा- दांडिया खेळत नसाल तर अशा पद्धतीच्या मोजडीही तुम्हाला चालू शकतात.

अशा पद्धतीच्या गरबा स्पेशल सॅण्डलही बाजारात मिळतात. पण जे लोक खूप वेळ आणि जवळपास रोजच दांडिया खेळतात त्यांच्यासाठी या सॅण्डलपेक्षा बूट जास्त आरामदायी असतात.

हे बूड दिसायला जाडजूड वाटत असले तरी ते अतिशय हलके असतात. त्यामुळे दांडिया खेळताना काहीही त्रास होत नाही.

गरबा- दांडिया स्पेशल बुटांचा हा आणखी एक सुंदर, देखणा प्रकार पाहा.