गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 13:59 IST2025-10-29T13:28:57+5:302025-10-29T13:59:19+5:30
सकाळची वेळ वेगवेगळ्या कामांसाठी तीन भागांमध्ये विभागली जाते. हा रूल फॉलो केल्याने दिवसभर फ्रेश राहाल.

सकाळी उठल्यानंतर आळस येणं सामान्य आहे. आळसामुळे कधीकधी अंथरुणातून उठणं देखील कठीण होतं. यामुळे तुम्हाला दिवसभर थकवा आणि उर्जेची कमतरता जाणवते.

जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली केली तर तुम्हाला दिवसभर पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक वाटेल. २०-२०-२० रूल तुमचं जीवन बदलू शकतो. यामध्ये सकाळची वेळ वेगवेगळ्या कामांसाठी तीन भागांमध्ये विभागली जाते. हा रूल फॉलो केल्याने दिवसभर फ्रेश राहाल.

काय आहे २०-२०-२० रूल?
२०-२०-२० रूलनुसार, तुम्ही सकाळी उठून तुमचा वेळ २०-२०-२० मिनिटांमध्ये विभागला पाहिजे. पहिल्या २० मिनिटांत लाईट कार्डिओ वर्कआऊट, योगा किंवा वेगाने चाललं पाहिजे.

तुमच्या हृदयाची गती वाढेल आणि तुम्हाला वर्कआऊटमुळे घाम येईल, ज्यामुळे तुम्ही सकाळी पूर्णपणे एक्टिव्ह राहाल आणि दिवसभर उत्साही राहाल.

दुसरी २० मिनिटं
लिहिण्यासाठी या २० मिनिटांचा वापर करा. तुम्हाला दिवसभरात पूर्ण करायच्या कामांची यादी बनवू शकता किंवा तुम्हाला त्रास देणाऱ्या विचारांबद्दल किंवा गोष्टींबद्दल लिहू शकता.

२० मिनिटे खोलवर विचार करण्यात आणि लक्ष केंद्रित करण्यात घालवा. लेखन मन शांत करण्यास आणि दिवसाची सुरुवात चांगल्या मानसिकतेने करण्यास मदत करतं.

शेवटची २० मिनिटं
तुम्ही २० मिनिटं तुमच्या आवडत्या विषयावरील पुस्तक वाचण्यासाठी किंवा पॉडकास्ट ऐकण्यासाठी वापरू शकता. हे तुमचे मन लवकर एक्टिव्ह होईल आणि दिवसभर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता.

सकाळी उठल्यानंतर काय करू नये?
सकाळी उठल्यावर काही गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत. फोन वापरणं टाळा. तसेच उठताच उपाशी पोटी चहा पिणं टाळा, यामुळे अॅसिडिटी होऊ शकते.

सकाळी पोटाच्या समस्या उद्भवल्याने तुमचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. सकाळी उठल्यानंतर नकारात्मक विचार टाळणं देखील महत्त्वाचं आहे

















