फुलाफुलांचं पेंडंट असणारी ८ मंगळसूत्र, नेहमीपेक्षा वेगळे सुंदर डिझाइन्स- पाहतच राहावे इतके देखणे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2025 16:12 IST2025-04-12T19:59:27+5:302025-04-14T16:12:27+5:30

मंगळसूत्राचे वेगवेगळे डिझाईन्स ट्राय करून पाहायला अनेकजणींना खूप आवडतं.. प्रत्येक ड्रेसनुसार वेगवेगळे मंगळसूत्र अनेकजणी हौशीने घालतात...(8 stylish patterns of flower pendant mangalsutra)
म्हणूनच आता अशा पद्धतीचं फुलाफुलांचं पेंडंट असणारं मंगळसूत्रही ट्राय करून पाहा.(latest pattern flower pendant mangalsutra designs)
अशा प्रकारचे कित्येक वेगवेगळे प्रकार सध्या बाजारात पाहायला मिळतात. यातले काही तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही मागवू शकतात..
फुलं आणि त्याला एक किंवा दोन्ही बाजुंनी नाजुक वेल अशा प्रकारचे डिझाईनसुद्धा गळ्यात खूप छान दिसते.
जर लांब, मोठं, ठसठशीत मंगळसूत्र घेणार असाल तर त्याला अशा पद्धतीच्या फुलांच्या वाट्यांचं पेंडंट घेऊ शकता.
अशा पद्धतीचे स्टोनचे फुलांचे मंगळसूत्रही बाजारात मिळतात. किंवा तुमचं बजेट जास्त असेल तर तुम्ही ते अमेरिकन डायमंड, अस्सल हिरे यांचा वापर करूनही बनवून घेऊ शकता.
हे डिझाईन एकदम वेगळं आणि पाहताक्षणीच आवडणारं आहे. शिवाय ते वेस्टर्न कपड्यांवरही सहज चालून जाऊ शकतं.
हे एक डिझाईन पाहा.. असं एखादं मंगळसूत्र आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवं..