खलबत्ता -रवी आणि परात स्वयंपाकघरातील 'या' भांड्यांना इंग्रजीत काय म्हणतात ? बघा, मजेशीर नावे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2025 10:00 IST2025-10-07T10:00:00+5:302025-10-07T10:00:02+5:30
English names of household items used in your kitchen : kitchen items names in english : common kitchen items names in english : स्वयंपाकघरामध्ये वापरल्या जाणाऱ्या नेहमीच्या वापरातील भांडी आणि त्यांची इंग्रजी नावे नेमकी काय आहेत ते पाहा...

आपल्या डेली रुटीन मधील स्वयंपाकघर म्हणजे घराचा सगळ्यात (English names of household items used in your kitchen) महत्त्वाचा भाग असतो. सकाळपासून रात्रीपर्यंत आपली अनेक काम बहुतेकवेळा किचनमध्येच होतात. दिवसभरात आपण किचनमधील अनेक भांड्यांचा वापर करतो परंतु, त्या भांड्यांची इंग्रजी नावे आपल्याला माहीत नसतात. उदाहरणार्थ, तवा, झारी, रवी पळी, चिमटा अशा वस्तू आपण नेहमी वापरतो पण त्यांची इंग्रजी नावे सांगायची वेळ आली तर क्षणभर थांबून विचार करावा लागतो.
स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या अनेक भांड्यांची इंग्रजी नाव (kitchen items names in english) आपल्याला माहीत नसतात. किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही नेहमीच्या वापरातील भांडी आणि त्यांची इंग्रजी नावे खालीलप्रमाणे आहेत.
१. स्वयंपाकघरात भाजी, आमटी किंवा इतर पदार्थ कालवण्यासाठी आपण हलक्याशा खोलगट आणि वक्र चमच्याचा वापर करतो. त्याला इंग्रजीमध्ये, Ladle (लॅडल) असे म्हणतात.
२. रोटी, डोसा किंवा पराठा तयार करण्यसाठी वापरल्या जाणाऱ्या सपाट तव्यासाला इंग्रजीत Griddle (ग्रिडल) व Flat Pan (फ्लॅट पॅन) असे इंग्रजीत म्हणतात.
३. मोठ्या कणीक मळण्याच्या परातीला, High-Hipped Platter (हाय-हिप्ड प्लॅटर) किंवा सोप्या भाषेत Large Shallow Bowl किंवा Dough Kneading Plate असे म्हणू शकता.
४. चपाती लाटण्याच्या पोळपाट - लाटण्याला Rolling Pin and Board (रोलिंग पिन ॲन्ड बोर्ड) असे म्हटले जाते.
५. गरम पदार्थ उचलण्यासाठी किंवा पोळ्या, पापड भाजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चिमट्याला Tongs (टॉन्ग्स) असे म्हटले जाते.
६. दही, ताक किंवा लस्सी घुसळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रवीला Muddler (मडलर) किंवा Churner (चर्नर) असे इंग्रजीत म्हणतात.
७. तळलेले तेलकट पदार्थ तेलातून काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जाळीदार झाऱ्याला Skimmer (स्किमर) असे इंग्रजीत म्हणतात.
८. पदार्थ कुटून त्याची बारीक पूड तयार करणाऱ्याला खलबत्त्याला इंग्रजीत Mortar and Pestle (मोर्टर अँड पेस्टल) असे म्हटले जाते.