कोपरांवर काळपट थर-हातपाय काळवंडले? ७ घरगुती उपाय, त्वचा दिसेल स्वच्छ तेजस्वी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 19:02 IST2026-03-26T17:11:03+5:302026-03-26T19:02:30+5:30
Elbow Tanning Removal Tips : बटाट्यामध्ये नैसर्गिकरित्या त्वचा उजळवण्याचे गुणधर्म असतात.

हातांचे कोपर काळवंडणे ही एक सामान्य समस्या आहे. कोपरांची त्वचा शरीराच्या इतर भागांच्या तुलनेत जाड असते. त्यामुळे तिथे लवकर टॅनिंग होतं आणि मृत त्वचा जमा होते. (Elbow Tanning Removal Tips)

लिंबू आणि साखर
लिंबू अर्धा कापून त्यावर थोडी साखर घाला हे कोपरांवर ५ ते १० मिनिटं चोळा. लिंबू नैसर्गिक ब्लिचिंग एजंट आहे आणि साखर स्क्रबरचे काम करते. (7 Pro tips To Remove Elbow Tanning)

बेकिंग सोडा आणि दूध
बेकिंग सोड्यात थोडं दूध मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट कोपरांवर लावून ५ मिनिटं मसाज करा. त्यामुळे मृत निघून जाण्यास मदत होईल.

दही आणि बेसन
दोन चमचे बेसनात थोडं दही मिसळून पॅक तयार करा. हा पॅक कोपरांवर लावून सुकू द्या आणि नंतर कोमट पाण्यानं धुवा.

कोरफड
कोपर काळवंडले असतील तर रोज रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीचा गर लावा. यामुळे त्वचा मऊ होते पिग्मेंटेशन कमी होते.

बटाट्याचा रस
बटाट्यामध्ये नैसर्गिकरित्या त्वचा उजळवण्याचे गुणधर्म असतात. बटाट्याचा तुकडा कोपरांवर चोळा किंवा त्याचा रस २० मिनिटं लावून ठेवा.

हळद आणि मध
चिमूटभर हळद आणि एक मध आणि थोडं दूध एकत्र करून कोपरावर लावा. हळद एंटीसेप्टीक आणि मध त्वचेला मॉईश्चराईज करते.

काकडी
काकडीचा रस किंवा काकडीचा तुकडा कोपरांवर चोळल्यानं उन्हामुळे आलेलं टॅनिंग कमी होतं.

















