Dussehra 2025 : दसऱ्याच्या मुहूर्तावर घ्या सुबक- सुंदर सोन्याचे कानातले; कमी वजनाच्या १० नवीन डिजाईन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 19:02 IST2025-09-29T17:21:00+5:302025-09-29T19:02:22+5:30

Dussehra 2025 : सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडत आहेत. जास्त भाव वाढण्याआधीच तुम्ही या दसऱ्याला एक छोटसं गिफ्ट स्वत:ला किंवा घरातील सदस्यांना देऊ शकता.

दसरा (Dussehra 2025) सोनं खरेदी करण्यासाठी शुभ दिवस मानला जातो. दसऱ्याच्या सणाला अनेकजण सोनं खरेदी करतात. तुम्ही फार काही घेणार नसाल तरी रोजच्या वापरासाठी सुंदर कानातले घेऊ शकता.(Dussehra Special Light Weight Gold Earrings For Dusshera)

सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडत आहेत. जास्त भाव वाढण्याआधीच तुम्ही या दसऱ्याला एक छोटसं गिफ्ट स्वत:ला किंवा घरातील सदस्यांना देऊ शकता. (Light Weight Gold Earrings For Dusshera)

हे कानातले वजनाला कमी आणि कमीत कमी ग्रॅममध्ये सुंदर डिजाईन्ससह तुम्हाला बनवून मिळतील. या डिजाइन्स तुम्हाला कोणत्याही ज्वेलर्सच्या दुकानात किंवा ऑनलाईन शॉप्समध्ये बनवून मिळतील.

हे सिंपल आणि सुरक्षित डिजाई्स आहेत. हे कानाला अगदी चिकटून बसतात ज्यामुळे रोजच्या कामात अडथळा येत नाही.

छोट्या आकाराचे हूप्स रोजच्या वापरासाठी चांगले दिसतात. साधे, गोलाकार किंवा त्रिकोणी हुप्स त्याखाली लटकन तुम्ही निवडू शकता.

काही कानातल्यांमध्ये एक छोटा लटकलेला सोन्याचा तुकडा किंवा पातळ साखळी असते. जी युनिक लूक देते

तुम्हाला पारंपारीक लूक हवा असेल तर अतिशय लहान झुमके रोजच्या वापरासाठी घेऊ शकता.

कानातले घेताना वजनाला हलके असतील असं पाहा. ज्यामुळे ते वापरायला सोपे असतात आणि बजेटमध्येही बसतात.

कानातले जास्त धारदार नसावेत किंवा जास्त मोठेही नसावेत. ज्यामुळे कानाला त्रास होत नाही.

कानातल्यांनी लॉकिंग सिस्टिम कशी आहे ते पाहून घ्या. अनेकदा लॉक उघडणं आणइ बंद करणं किचकट होतं त्यामुळे चांगल्या कानातल्यांनी निवड करा.