शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

गोड ते तिखट - उन्हाळ्यात ताक प्या ५ प्रकारे, विविध रेसिपी करा आणि पोटाला द्या थंडावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2026 18:11 IST

1 / 6
ताक नुसत तर पिता येतंच मात्र त्याच्या ५ रेसिपी ही करता येतात. ताकात विविध पदार्थ घालून त्याची चव बदलता येते. तसेच त्याच्या गुणधर्मांवरही परिणाम होतो. पाहा ५ रेसिपी.
2 / 6
साधं ताक हे दही आणि पाणी एकत्र करून तयार केलेलं अतिशय हलकं, नैसर्गिक आणि पचायला सोपं पेय आहे. रोजच्या आहारात सहज समाविष्ट करता येतं. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यास ते विशेष उपयोगी ठरतं आणि पोटातील उष्णता कमी करण्यास मदत करतं. पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी हे ताक खूप फायदेशीर मानलं जातं.
3 / 6
मसाला ताकात जिरं, काळं मीठ, कोथिंबीर, आलं, कडीपत्ता यांसारखे मसाले घातले जातात. त्याची चव अधिक रुचकर होते. त्यामुळे जेवणाची मजा वाढते. हे ताक विशेषतः जड जेवणानंतर घेतल्यास पचन सुधारण्यास मदत करतं. तसेच शरीराला हलकं वाटतं आणि तोंडाची चवही छान राहते.
4 / 6
पुदिन्यामुळे ताकाला सुगंध आणि थंडावा मिळतो, त्यामुळे ते उन्हाळ्यासाठी परफेक्ट पेय ठरतं. हे ताक शरीरातील उष्णता कमी करतं आणि तोंडाला ताजेपणा देतं. दिवसभरातील थकवा कमी करण्यासाठीही हे ताक उपयुक्त मानलं जातं.
5 / 6
लसूण ताक हे थोडं तिखटसर आणि वेगळ्या चवीचं असल्यामुळे खास आवडीनुसार प्यायलं जातं. यामुळे ताकाला एक वेगळी चव येते. लसणामध्ये असलेले गुणधर्म पोटातील अपायकारक जंतू कमी करण्यास मदत करतात. तसेच पचनसंस्थेला बळकट करून गॅसेस आणि अपचनाचा त्रास कमी करण्यास सहाय्य करतात.
6 / 6
गोड ताकात साखर घालून केलं जास्त. लस्सी नाही फक्त थोडी साखर घालायची. अनेकांना हे ताक आवडत नाही तर काही जणांना आवडतं. कारण ताक हा गोड पिण्याचा पदार्थ नाही असा या पदार्था विषयी वाद ऐकायला मिळतो. मात्र हे ताक शरीराला झटपट ऊर्जा देतं आणि थोडासा गोड पर्याय म्हणून जेवणानंतर किंवा मध्येही घेता येतं. तसेच उष्णतेत शरीर शांत ठेवण्यास मदत करतं.
टॅग्स :foodअन्नRecipeपाककृतीCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.kitchen tipsकिचन टिप्सSummer Specialसमर स्पेशल