रोज फक्त ५ मिनिटं करा ‘हा’ प्राणायाम, श्वसनाचे त्रास होणार नाहीत-थकवा कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2025 16:54 IST2025-05-20T16:48:21+5:302025-05-20T16:54:29+5:30

Do this pranayama for just 5 minutes every day, you will not have breathing problems : योगासने करणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच प्राणायाम करणेही गरजेचे आहे. महिलांनी करायलाच हवे हे काही प्राणायाम. आरोग्य राहील चांगले.

योगशास्त्रात प्राणायामाला फार महत्व आहे. श्वासावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्राणायाम उपयुक्त असतात. तसेच श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेत काही अडथळे येऊ नयेत कृती छान सुरळीत व्हावी यासाठी प्राणायाम करणे गरजेचे असते.

श्वास घेणे, श्वास रोखणे आणि श्वास सोडणे या काही कृती आपण सतत करत असतो. २४ तास श्वासाची प्रक्रिया चालूच असते. याच तीन कृती चांगल्या व्हाव्या यासाठी प्राणायाम असतात.

त्याच बरोबर प्राणायामामुळे मानसिक आरोग्य सुधारते. मेडीटेशनचाच एक प्रकरा असल्याने डोक्यासाठी, बुद्धीसाठी व मनासाठी प्राणायाम उपयुक्त ठरतात.

कपालभाती हा प्रकरा करताना श्वास घेणे आणि श्वास सोडणेही साधी क्रियाच करायची असते मात्र मन एकाग्र करुन करायचे असते. कपालभातीमुळे पचन सुधारते तसेच शांत वाटते.

भस्त्रिका हा प्रकार करताना श्वास जोरात घ्यायचा आणि वेगाने सोडायचा. पटकन क्रिया झाली पाहिजे. असे केल्याने फुफ्फुसांची क्षमता वाढते. शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळतो.

अनुलोम विलोम हा प्राणायाम करताना एका नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि दुसर्‍या नाकपुडीने सोडायचा. नाडी शुद्धीसाठी हा प्रकार फायद्याचा ठरतो. तसेच सर्दी खोकला असे आजार बरे होतात.

भ्रामरी हा प्रकार नावाप्रमाणेच आहे. डोळ्यावर बोटे ठेवायची कानावर बोटे ठेवायची. भुंग्या सारखा आवाज करत श्वास घ्यायचा आणि सोडायचा. झोपेचा काही त्रास असेल तर झोप छान लागायला लागेल. मेंदूसाठी उपयुक्त असा हा प्रकार आहे.